अमोल साबळे
अकोला – खरिपात सततचा पाऊस, अतिवृष्टीने तीन लाख हेक्टरवर क्षेत्र शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. यासाठी विमा भरपाई मिळणे क्रमप्राप्त असताना पीक विमा कंपन्यांची मनमानी सुरू आहे. बहुतांश जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळाली असताना अमरावती, अकोल्यात मात्र कंपन्यांची मनमानी सुरू असल्याने शेतकऱ्यांना छदामही मिळालेला नाही.
पीक नुकसानासाठी जिल्ह्यातील १.१५ लाख शेतकऱ्यांनी विहीत ७२ तासांच्या आत पीक विमा कंपनी व कृषी विभागाकडे पूर्वसूचना अर्ज दाखल केलेले आहेत. त्यातुलनेत सध्यापर्यंत १७,६६१ शेतकऱ्यांच्या अर्जाचा सर्वेक्षण अद्याप प्रलंबित आहे. या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईचा अग्रीम देणे महत्त्वाचे असताना कंपनीद्वारा वेळकाढूपणा करण्यात येत असल्याचे दिसून येते. काढणीपश्चात पिकांचे नुकसान झाल्याने ८५७१ शेतकऱ्यांनी कंपनीकडे अर्ज केले आहेत. या शेतकऱ्यांना कंपनीद्वारा अद्याप नकसानभरपाई देण्यात आली
अमरावती, अकोला, सोलापूर जिल्ह्यातील अधिसूचनेवर आक्षेप; अद्याप लाभ नाही
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील १६ जिल्ह्यात जिल्हाधिकायांनी तूर, कपाशी, सोयाबीन धान, मका व खरीप ज्वारी या पिकांना पीक विमा भरपाईचा अग्रीम देण्यासाठी अधिसूचना काढली होती. यामध्ये फक्त अमरावती, अकोला व सोलापूर जिल्ह्यात पीक विमा कंपनीने आक्षेप नोंदविले असल्याने अद्याप शेतकन्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही.
या जिल्ह्यातील मिळाली पीक विम्याची भरपाई
प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानासाठी गोंदिया जिल्ह्यात २.३२ कोटी, कोल्हापूर १२.३० लाख, जालना ४४.९६ कोटी, परभणी ४०.७२ कोटी, नागपूर १०.४९ कोटी, वर्धा १५.३४ कोटी, लातूर २१.७९ कोटी, उस्मानाबाद १०४.७६ कोटी, गडचिरोली ३.७२ कोटी, नांदेड ४२०,०५ कोटी, बीड जिल्ह्यात ६२.१५ कोटी अशी भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
नाही. यंदाचे खरिपातील सोयाबीनचे उत्पन्नात सरासरी ५० टक्क्यांवर कमी येत असल्याने जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी १३ सप्टेंबरला १२ तालुक्यातील ८० महसूल मंडळांसाठी अधिसूचना काढली. यावर पीक विमा कंपनीने आक्षेप नोंदविला
हे आक्षेप कृषी विभागाने खोडून काढले. यानंतर विभागीय कृषी सहसंचालक व कृषी आयुक्तालयाने पीक विमा कंपनीला अल्टिमेटम दिलेला असताना पीक विमा कंपनी कुणाचेच जुमानत नसल्याचे दिसून येतं….