बाळापूर – सुधीरकुमार कांबेकर
बाळापूर शहरा जवळ असलेल्या हिंगणाशेळद येथील ५० भाविकांना दूषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याची घटना २७ डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे. यातील सात जणांवर दवाखान्यात उपचार सुरू असून, इतर भाविकांच्या तब्बेतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे .
हिंगणा शेळद येथील भाविक २४ डिसेंबर रोजी शेगाव येथे दिंड़ी घेऊन गेले होते दरम्यान कुठं तरी दूषित पाणी पिण्यात आल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी उलटीचा त्रास होवू लागला असल्याने . त्यांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले, याबाबतची माहिती मिळताच खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या भाविकांवर २६ डिसेंबरपासून पारस प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या दोन पथकाकडून उपचारकरण्यात येत आहे.
भक्ती ज्ञानेश्वर नळकांडे (१०), कल्याणी मोहन नळकांडे (१४), वैशाली अनंत नळकांडे(३o), दुर्शा दशरथ नळकांडे (3०),साक्षी संदीप नळकांडे (१७), शरकुंतला बाई नळकांडे (५०), गीता दशरथ नळकांडे (४२), दृष्टी नितीन डिगोळे(१) यांच्यावर ग्रामीण रुश्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले.