आंध्र प्रदेश मध्ये विजयवाडा येथे 38 वी राष्ट्रीय तायकांडो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा चिन्हा पट्टी रामकुटाया ईन्डोर स्टेडियम विजयवाडा येथे दिनांक 22,23 आणि 24 ला संपन्न झाली या स्पर्धेमध्ये मूर्तिजापूर सिटी तायकांडो क्लबच्या विराट गुप्ता,विकी अविनाशे,कु.सानवी नांदेकर,रोहित खंडारे यांनी सुवर्णपदक पटकावले.
रौप्यपदक प्राप्त करणारे खेळाडू शिवराज बाजाड,मनस बाहेती, हर्ष खाडे,शुभम यादव,निखिल दबाले व कांस्यपदक प्राप्त करणारे खेळाडू श्रेयस शेगावकर,विराज नांदेकर, शक्ती प्रभे,दुर्गेश प्रधान,ज्ञानेश बाहेयांना प्राप्त झाले राष्ट्रीय तायकोंडो स्पर्धेमध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र,ओरिसा,तमीलनाडू,न्यू वेस्ट बंगाल,जम्मू काश्मीर,उत्तर प्रदेश येथील खाळाडूंनी साहबग घेतला होता.
विजते सिटी तायकोंडो क्लबचे खेळाडू आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील आणि सिटी तायकोंडो क्लबचे प्रशिक्षक दिनेश श्रीवास यांना देतात. या स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगटातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे सुवर्णपदक पटकावणारी मुर्तीजापुर येथील कु.सानवी दीपक नांदेकर ही महाराष्ट्र मधून गोल्ड आणणारी पहिली मुलगी आहे.
सर्व विजयत्या खेळाडूंचे कौतुक मुन्ना श्रीवास,ज्ञानेश्वर टाले,नितीन माडगूळकर,दीपक नांदेकर,लखन ढेंगेकार, राज गोडाले,प्रतीक यादवर, अभिषेक तिवारी,सुमित बेळगावकर या सर्वांनी खेळाडूंचे स्वागत व कौतुक केले.