Thursday, September 12, 2024
spot_img
Homeराज्यविद्यासागर कला महाविद्यालयात शिक्षक दिनाचे आयोजन...

विद्यासागर कला महाविद्यालयात शिक्षक दिनाचे आयोजन…

रामटेक – राजु कापसे

रामटेक विद्यासागर कला महाविद्यालय खैरी ( बिजेवाडा ) रामटेक येथे ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण देशात माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

या दिवसाचे औचित्य साधून विद्यासागर कला महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा संपूर्ण कारभार आपल्या हाती घेत प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची भूमिका वठवीत शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला साजरे केले.

यानंतर संपन्न झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षक व कर्मचारी बनवून त्यांना आलेल्या अनुभवाचे वर्णन आयोजित सत्कार कार्यक्रमात केले. प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश सोमकुवर उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ. गिरीश सपाटे व डॉ. सावन धर्मपुरीवार उपस्थित होते.

याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंदांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले.

महाविद्यालयातील प्रा.अनिल दाणी, डॉ.ज्योती कवठे, सांस्कृतीक कार्यक्रम प्रमुख डॉ. रवींद्र पानतावणे, डॉ . सतीश महल्ले, डॉ. आशिष ठाणेकर, गंगा मोंढे ठकरेले, तसेच शिक्षकेतर कर्मचारी जितेन्द्र बडनाग, युनूस पठाण, ललित कनोजे, रफिक कुरेशी, ज्ञानेश्वर हटवार तसेच विद्यार्थी प्राचार्य बनलेली आँचल गौरखेडे उपस्थित होते.

महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. गिरीश सपाटे तसेच डॉ.सावन धर्मपुरीवार यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. सुरेश सोमकुवर यांनी कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनासाठी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी विद्यार्थी प्राचार्य बनलेल्या आँचल गौरखेडे हिने आपले मनोगतातून विद्यार्थ्यांना आलेला अनुभव कथन केला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सागरीका चरडे हिने केले आणि आभार माधुरी कुंभरे हिने मानले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: