रामटेक – राजू कापसे
20 नोव्हेंबरला होणाऱ्या रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 359 पोलिंग पार्ट्याचे 1476 कर्मचारी आणि 359 पोलीस कर्मचारी रवाना झाले. संस्कृत विदयापीठ मधे तयार केलेल्या डोममधून पोलिंग पार्टी यानां साहित्य वाटप करण्यात आले. 36 अतिरिक्त पोलिंग पार्टी तयार ठेवण्यात आल्या।
रामटेक विधानसभेत 142231 पुरुष मतदार , 141307 महिला मतदार इतर 373 असे एकूण 283911 मतदार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी प्रियेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रमेश कोळपे,
अतिरिक्त तहसीलदार पूनम कदम, नायब तहसीलदार महेश कुलदीवार, मुकुंद भुरे, भोजराज बडवाईक, सारिका धात्रक, रमेश पागोटे यांच्यासह 250 अधिकारी कार्यरत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, ठानेदार आसाराम शेटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.