अपघाता चि मालिका संपेना
पातुर – निशांत गवई
पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखलगाव. येथे भिषण अपघात हा 12.30 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे या अपघाता मंध्ये जळ वाहन ट्रक व बलेनो कार याचा अपघात झाला ही कार चिखलगाव येथील स्थानिक नागरिक गुलाब तायडे यांचा मुलाची असल्याची महिती मिळाली आहे.
या कार मध्ये गुलाब तायडे यांचे नातेवाईका सह एकूण तीन प्रवासी कार आमनेसामने जोरदार धडक झाल्याने बलेनो कार मधील असलेले 3 इसम गंभीर जखमी झाल्याची माहिती पातुर येथील पत्रकार दुलेखा युसुफ खान यांनी दिली आहे.
दुलेखा युसुफ खान यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी रुग्णवाहिका वाहन चालक सचिन बारोकर व डॉक्टर फुरकान यांना दूरध्वनी वरून अपघात झालेल्या ठिकाणी बोलावून या अपघातातील जखमींनवर उपचाराकरिता अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.
या अपघाता मंध्ये चिखलगाव येथील नागरिक गुलाब तायडे यांचा मुलगा हा भारतीय लष्करामध्ये असल्याची माहिती मिळत आहे व त्यांची नातेवाईक दोन मुले या गाडीत असून जडवाहन व कार क्र MH 30 BB7626, असलेली गाडी आमने-सामने जोराने धडक झाल्याने कारला जळवाणाच्या धडकेने खूप प्रमाणात क्षती पोहोचली आहे.
यामध्ये ट्रक क्रमांक MH 12 FC 9099 क्रमांक असलेला हा चिखलगाव नजदीक उड्डाणपुलाच्या विरुद्ध दिशेने जात असताना समोरून आलेले बलेनो कार ही चिखलगाव येथील असल्याने ट्रक व कार मध्ये आमने-सामने धडक झाली या मंध्ये ट्रक जागेवर पलटी झाल्याने कार शेतीग्रस्त झाली आहे.
त्यामधील तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे यावेळी पातुर पोलीस स्टेशनला माहिती मिळतात ठाणेदार किशोर शेळके व पातुर पोलिसांनी अपघात स्थळी घेऊन गंभीर जखमींना अकोला जिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके करीत आहे.