Monday, June 24, 2024
spot_img
Homeराज्यसन २०२३ मध्ये पोलीस भरती झालेल्या उमेदवारांचा आर.के.स्पोर्ट्स कडून साई मंगल कार्यालयात...

सन २०२३ मध्ये पोलीस भरती झालेल्या उमेदवारांचा आर.के.स्पोर्ट्स कडून साई मंगल कार्यालयात सत्कार संपन्न…

सांगली – ज्योती मोरे.

सन 2023 या वर्षात रेल्वे पोलीस आर्मी यादी भरत्यांमध्ये सांगलीतील आर के स्पोर्ट्स चे १२३ विद्यार्थ्यांची निवड झाली. या यशस्वी विद्यार्थ्यांचा आज आर.के.स्पोर्ट्सच्या वतीने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने,जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे,नगरसेवक विष्णू माने यांच्या हस्ते साई मंगल कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यावेळी,नगरसेवक मनोज सरगर,सुनील भोसले,सौ.छाया सर्वदे, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील, अनिल दुधाळ,आर.के. स्पोर्ट्सचे संस्थापक राहुल कांबळे, डॉ.गणेश सिंहासने, रवींद्र कांबळे, नवनाथ पांढरे, महेश जाधव, संदीप डगेकर, प्रयाग पाटील, आदी मान्यवरांसह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान प्रत्येक कामात प्रामाणिकपणा आणि चांगला उद्देश असेल तरच कोणत्याही कामात अपयश येत नाही. त्या दृष्टीने प्रयत्न करावेत.असा संदेश डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिला.

तर आज संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आर. के.स्पोर्ट्स हे नाव पोहोचले असून याचे सर्व श्रेय मी माझ्या विद्यार्थ्यांना देतो, असे मनोगत संस्थापक राहुल कांबळे यांनी व्यक्त केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: