रोजगार महोत्सवात हजारो तरुण तरुणींनी लावली हजेरी…
रामटेक – राजु कापसे
चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे आज दिनांक २० नोव्हेंबरला शहरातील शांती मंगल कार्यालय येथे भव्य रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यात रामटेक विधानसभा क्षेत्रातील हजारो बेरोजगार तरुण तरुणींनी हजेरी लावून नोकरीचे निवेदन दिले.
दरम्यान यात तब्बल १८२४ बेरोजगार तरुण तरुणींचे विविध कंपन्यांद्वारे सिलेक्शन होऊन तात्काळ तेव्हाच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. आनंदाच्या भरात चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारताना तरुण-तरुणींनी चौकसेंचे यावेळी जाहीर आभार मानले.
रोजगार महोत्सवाला आज सकाळी दहाच्या सुमारास सुरुवात झाली. यावेळी मंचावर चंद्रपाल चौकसे , त्यांच्या अर्धांगिनी संध्या चौकसे , नाना उराडे , बळवंत पडोळे , रमेश ठाकरे आदी. उपस्थित होते. स्वागत सत्काराच्या कार्यक्रमानंतर चंद्रपाल चौकसे यांनी उपस्थित बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराचे महत्व पटवून देत विविध कंपन्यांच्या स्टॉलमध्ये जाऊन तथा बायोडेटा व लागणारी कागदपत्रे देऊन नोकरी मिळवण्याचे आवाहन केले.
दरम्यान यावेळी महोत्सवात पन्नाशीच्या घरात नामांकित कंपन्यांचे अधिकारी बँकांचे अधिकारी तथा आयटीआय मधले अधिकारी बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी स्टॉल लावून उपस्थित होते. शिस्तबद्ध पद्धतीने इंटरव्यू तथा सिलेक्शन प्रक्रिया पार पडली यावेळी बेरोजगार तरुण-तरुणींची मोठी रांग येथे लागलेली होती यांना सांभाळण्यासाठी मोठ्या संख्येत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.
शिस्तबद्ध पद्धतीने रामटेक विधानसभा क्षेत्रातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार मिळावा असा या महोत्सवा मागचा हेतू असल्याचे चंद्रपाल चौकशी यांनी माहिती देताना सांगितले. सदर रोजगार महोत्सवात मोठ्या संख्येने बेरोजगार तरुण-तरुणी हजेरी लावतील व त्यांना येथे संपूर्ण दिवसच लागेल या कारणास्तव येथे तरुण-तरुणींसाठी तथा त्यांच्या पालकांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी साडेपाच च्या सुमारास सदर महोत्सव कार्यक्रम संपुष्टात आला.