धर्मवीर संभाजी बहुउद्देशीय संस्था सातगाव चे आयोजन…
नागपूर – शरद नागदेवे
नागपूर -हिंगणा -सातगाव गुमगाव जिल्हा परिषद सर्कल च्या वर्ग दहावी व वर्ग बारावी च्या बोर्ड परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करणाऱ्या 150 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विविध सामाजिक उपक्रम राबवून सातत्याने समाज हित जपणारी सातगाव येथील धर्मवीर संभाजी बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने गुमगाव येथे दहावी व वर्ग बारावी च्या परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जेष्ठ नेते रमेशचंद्र बंग होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक, वक्ते बाळासाहेब कुलकर्णी, प्रसिद्ध वक्ते ऍड. दीपक चटप प्रमुख उपस्थिती म्हणून हिंगणा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विजय घोडमारे (पाटील), जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग,धर्मवीर संभाजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष योगेश सातपुते होते.
कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध वक्ते बाळासाहेब कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका की गुणवत्ता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तर सुप्रसिद्ध वक्ते एडवोकेट दीपक चटप यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यां पुढील भविष्यातील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले.
सातगाव गुमगाव जिल्हा परिषद सर्कलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सातगाव व गुमगाव अशा विभागात विभागणी करून प्रत्येक विभागातील तीन गुणवंत विद्यार्थ्यांना टॅबलेट चे वितरण करण्यात आले त्यात सातगाव विभागातून बारावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण घेणारा नकुल तुकाराम बोढेकर, दहावीच्या परीक्षेत 98.37% गुण घेणारी हर्षिता विशाल बिनझाडे व दहावीच्या परीक्षेत 95.40% गुण घेणारी श्रेया कवींद्र बोपचे तर गुमगाव विभागात बारावीच्या परीक्षेत 93.67% गुण घेणारा अजय देविदास वैरागडे, दहावीच्या परीक्षेत 93.20% गुण घेणारी स्नेहा शरद गुरनुले व दहावीच्या परीक्षेत 92.20% गुण घेणाऱ्या हिमांशू रवींद्र लिखार यांचा समावेश आहे. तर इतर गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर कार्यक्रमात वर्ग दहावीच्या 20 गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मवीर संभाजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक योगेश सातपुते (पाटील) यांनी सूत्रसंचालन अनुप आवारी यांनी तर आभार गुमगावचे सरपंच अरुण देवतळे यांनी मानले कार्यक्रमाला रवि देशमुख, वराडेजी वामनरावजी सातपुते रुपालीताई विजय लकडे सरपंच वडगांव गुजर, शोभाताई माहुरे सरपंच वाघदरा,होमराज मुळे सरपंच सालईदाभा, प्रवीणाताई शेळके उपसरपंच सातगाव, तेजराम ढवळे उपसरपंच गुमगाव, देवराव निमकर उपसरपंच वडगांव, अरविंद वाळके,सतिश भोडंगे,सुधाकर धामंदे,रवी मूते,सुखदेव बावने, बब्बुजी पठान, मयुर फुलकर, प्रमोद फुलकर, प्रशांत सोनकुसरे, पुरूषोत्तम ईटनकर,दिलीप कुभांरे,आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.