Monday, July 22, 2024
spot_img
Homeराज्य"माझी शाळा,सुंदर शाळा" या अभियानात भिलेवाडा शाळेला ११ लक्ष.रुपयांचा बक्षीस प्राप्त...

“माझी शाळा,सुंदर शाळा” या अभियानात भिलेवाडा शाळेला ११ लक्ष.रुपयांचा बक्षीस प्राप्त…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस वितरित.

रामटेक – राजु कापसे

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री “माझी शाळा, सुंदर शाळा” हे अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात आले होते.यातच भिलेवाडा गावातील जि.प.शाळेने तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला होता.याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवगिरी येथे “माझी शाळा,सुंदर शाळा” या अभियानात प्रथम,द्वितीय व तृतीय स्थान पटकविणाऱ्या शाळांना बक्षिक वितरण करण्यात आले.

यात जि.प.उच्च प्राथमिक शाळा भिलेवाडा या शाळेला प्रथम क्रमांक प्राप्त होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ लक्ष. रुपयांचे बक्षीस वितरित करण्यात आले. यावेळी सौम्या शर्मा (मुख्य कार्यकारी अधिकारी), विपीन इटनकर (जिल्हाधिकारी, नागपूर), रोहिणी कुंभार (माध्यमिक शिक्षणाधिकारी), सिद्धेश्वर काळूसे (प्राथमिक शिक्षणाधिकारी), आशिष जयस्वाल (आमदार,रामटेक), टेकचंद सावरकर (आमदार,कामठी), उपसरपंच गोपीचंद खडसे,शिक्षक रणभिड,जनार्दन ठोकणे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते..

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: