रामटेक – राजु कापसे
रामटेक तालुका येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिवणी (भो.) येथे ‘जल्लोष’ वार्षिक स्नेहसंमेलन रात्रीचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते.या संमेलनात प्रत्येक विद्यार्थी सहभागी व्हावा यासाठी मुख्याध्यापक निलेश नन्नावरे, सहायक शिक्षक गणेश बारेकर यांनी पुढाकार घेतला होता.
कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची उपस्थिती होती.विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कला सादरीकरणाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून काही पालकांनी आपल्या पाल्याचे कौतुक म्हणून बक्षिसे देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम वारंवार केले जावेत,अशी अपेक्षा शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष राजेश बडवाईक यांनी व्यक्त केली.गणेश बडवाईक पो.पाटील,तूलाराम गभने, कृष्णा पाटील व शालेय मुख्यमंत्री वैभवी पाटील उपस्थित होते.
गावात पहिली ते चौथी शाळा असून पहिल्यांदाच रात्रीचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजन करून विद्यार्थी,शाळा,गावं सर्व आपले म्हणून या विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर करून पालकांना आपला पाल्यात असनाऱ्या सुप्तगुण,कला याचा आस्वाद घेण्यासाठी खूप चांगले आयोजित केले याबद्दल असे विविध उपक्रम शाळेत घेण्यात यावे असे व्यक्तव अध्यक्ष गणेश बडवाईक यांनी केले.
संचालन गणेश बारेकर यांनी केले तर प्रास्ताविक विकास गणवीर केंद्रप्रमुख यांनी केले.आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षक,निलेश नन्नावरे गणेश बारेकर, सहायक बंटी इंगळे व गावकऱ्यांनी,पालकांनी मोलाचे सहकार्य केले