एकोडी – महेंद्र कनोजे
एकोडी 1 जुलै 2024 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी येथे प्रवेशोत्सवा अंतर्गत नवागतांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले. चॉकलेट व प्रधानमंत्री पोषणशक्ती आहार योजनेअंतर्गत गोड जेवणाचं आयोजन करण्यात आले.
अदानी फाउंडेशन व जिल्हा परिषद गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात येणाऱ्या आमची शाळा -आदर्श शाळा स्पर्धेमध्ये शाळेचा प्रथम क्रमांक आला सदर पुरस्कार राशीच्या रकमेतून कॅम्पुटर लॅब तयार करण्यात आली व कॉम्पुटर लॅब चे उद्घाटन सौ. शालूताई चौधरी ग्राम पंचायत सरपंच एकोडी , श्री रवीकुमारजी पटले माजी सरपंच एकोडी,किरनकुमार मेश्राम माजी उपसरपंच एकोडी ,श्री कवाने सर प्राचार्य भारतीय विद्यालय एकोडी तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. हेमलताताई टेंभरे: उपाध्यक्ष अरुणकुमार बिसेन सदस्य: महेंद्र कनोजे, प्रविण दखणे,अनंदा ताई लिल्हारे,शारदा ताई बिसेन, छनुताई चौधरी,व तसेच शाळेच्या शिक्षिक एम आर उईके मेडम, हरिणखेडे सर ,सी डी हरिणखेडे मेडम, एस एम चव्हाण मेडम, यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक व प्रभारी केंद्रप्रमुख श्री.एन. जी.डहाके सर यांची *विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती मिळण्याची अभिनंदन करण्यात आले.