Saturday, December 21, 2024
Homeराज्यजिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथड़ेचा मुलगा घेत आहे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण…

जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथड़ेचा मुलगा घेत आहे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण…

ज्या प्रमाणे जिल्हा परिषद सदस्याचा मुलगा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे त्याच प्रमाणे इतरांनी सुद्धा आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिक्षण द्यावेत जिल्हा परिषद सदस्य : जगदीश (बालु) बावनथड़े…

गोंदिया : राजेशकुमार तायवाडे

तिरोडा तालुका वडेगाव येथे तीन अंकी मराठी नाटिका – बाई तुमचा दाखवा की रंगमहाल च्या उद्धघाटना प्रसगी मार्गदर्शनाच्या माध्यमातून जनतेला सांगितले की एक जिल्हा परिषद सदस्य ज्या प्रमाणे आपल्या मुलाला जिल्हा परिषद हायस्कूल सुकडी मध्ये शिकवू शकतो. तर तुम्ही का शिकवू शकत नाही.

आता सर्व पालकांनी एक लक्ष केंद्रित करा कि माझा पाल्य हा जिल्हा परिषद शाळेत शिकवणार असा विचार करून पुढे जाण्याचा संकल्प करा. त्या वेळी प्रामुख्याने उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया ,ओम पटले संचालक,छोटे लाल बिसेन संचालक तिरोडा, दुर्गेश कळपती,

निता रहांगडाले माजी सभापती पंचायत समिति तिरोडा, सुनीता मडावी माजी जिल्हा परिषद सदस्या ,तुमेस्वरी बघेले जिल्हा परिषद सदस्या ,ड्रा. मुकेश ,नासीर घाणीवला ,तेजराम चव्हाण पंचायत समिति सदस्य ,मोरेश्वर ठाकरे ,ड्रा. गिरधारी बिसेन ,नीलकंठ रहांगडाले, अतुल बोदेले, तिलकचंद रहांगडाले ड्रा. माणिकराव बिसेन व मोठया संख्येने उपस्थित जनसमुदाय होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: