Sunday, December 22, 2024
Homeराज्यजिल्हा भूषण राजे शिवाजीराव वामनराव देशमुख एक आदरणीय व्यक्तिमत्व…

जिल्हा भूषण राजे शिवाजीराव वामनराव देशमुख एक आदरणीय व्यक्तिमत्व…

हेमंत जाधव

खामगाव शहराच्या जहागीरदार, वतनदार घराण्यात जन्मलेले आजही हा मान जोपासून असलेले पितृतुल्य शिवाजीराव वामनराव देशमुख यांना प्रेस क्लब खामगाव ने जिल्हा भूषण पुरस्काराने गौरविले आहे पत्रकार दिनी दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे खरे मानकरी असलेले शिवाजीराव याचे व्यक्तिमत्व सुध्दा तसेस आहे.

वतनदार घराण्यात जन्म घेऊन सर्व सामन्याच्या समस्यांची सदैव जाण असलेले शिवाजीराव यांनी आपला नावलौकिक आजही टिकऊन ठेवला आहे खामगाव च्या राजकारणात सक्रिय राहून नगरसेवक पदा पासून अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली आहेत या घराण्याला प्रत्येक सार्वजनिक सण व उच्छवात मानाचे स्थान आहे ते जोपासून सर्व धर्म समभावाची वागणूक शिवाजीराव सर्वजनतेला देतात प्रसंगी गोरगरीब दिन दुबळ्याना मदतीचा हात देऊन अनेकांचे संसार या महानव्यक्ती ने उभारले आहेत.

आपल्या हातून घडलेल्या सत्कर्माचा गर्व न करता सर्वांशी प्रेमाने वागण्याचा त्यांचा स्वभाव आहे या मुळेच जिल्याच्या मान्यवरा मध्ये शिवाजीराव यांचे आदराने नाव घेतल्या जाते राजे म्हणून त्यांना सर्व मान देतात अशा या सन्मानिय व्यक्तीस प्रेस क्लब ने जिल्हा भूषण पुरस्काराने गौरविल्याने खऱ्या अर्थाने या पुरस्काराची महती वाढली आहे.

शिवाजीराव यांनी आपल्या परिवारावर समाजसेवेचे संस्कार रुजविले असून नगरसेवक असलेले त्याचे सुपुत्र देवेंद्रदादा देशमुख हे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून रावबहादूर
देशमुख घराण्याचा वारसा चालवीत आहेत सर्वधर्म समभाव जोपासून जहागिरदारांचे वारसदार समाजाची सेवा करण्या मध्ये अग्रेसर आहेत ही शिकवण शिवजीराव यांनी आपल्या आचरणातून आपल्या परिवाराला दिली आहे या मुळेच ते जिल्याचे भूषण ठरले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: