रामटेक – राजु कापसे
राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या तीन हजार रूपयाच्या लाभ घेण्याची विनंती तहसीलदार रमेश कोलपे यानी केली. 26 ऑगस्टला तहसील कार्यालय येथे ज़ेस्ट नागरिकांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना म्हणाले.
तहसीलदार म्हणाले की वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट,
सर्वाइकल कॉलर इ. सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने खरेदी करणेकरिता तसेच योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनाच्या तात्काळ लाभ घेण्याचे त्यानी ज़ेस्ट नागरिकांना आव्हान केले.
तसेच तहसीलदार यानी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या लाभ घेण्याविषयी जेष्ठ नागरिकांना आव्हान केले. ते म्हणाले की शर्ती अटीसह योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील. तीर्थस्थळां मधे अ व ब दर्ज़ाचे तीर्थस्थळ समाविष्ट राहिल.
सदर योजनेंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चा करिता प्रती व्यक्ती ३० हजार देण्यात येईल. यामध्ये प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबींचा समावेश असेल.
यावेळी नायब तहसीलदार मुकुंद भूरे व सारिका धात्रक, राजू तडस, तसेच जेष्ठ नागरीक मंडळचे अध्यक्ष रमेश चौकसे, उपाध्यक्ष विजय खंडार, सचिव वामन वामन नायगांवकर , सहसचिव रमाकांत कुंभलकर, हरीहर भुजाडे शहित आदि उपस्थित होते.