Thursday, November 14, 2024
HomeAutoझेलिओ ईबाइक्सने लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर 'एक्स-मेन २.०' लॉन्च...

झेलिओ ईबाइक्सने लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर ‘एक्स-मेन २.०’ लॉन्च…

चार व्हेरिएंटयामध्ये होणार उपलब्ध; ७१,५०० रुपये एक्स-शोरूम किंमतीपासून सुरु

भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील एक आघाडीची कंपनी असलेल्या झेलिओ ईबाइक्सने, त्यांच्या लोकप्रिय एक्स-मेन मालिकेची अपग्रेड केलेली आवृत्ती, एक्स-मेन २.० लाँच केली. वर्धित वैशिष्ट्यांसह आणि सुधारित कार्यक्षमतेसह, एक्स-मेन २.० ची रचना ही अशा आधुनिक शहरी प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केली गेली आहे, ज्यात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयात जाणारे, कार्यालयीन कर्मचारी आणि विश्वासार्ह, पर्यावरणास अनुकूल आणि शैलीदार राइडचा शोध घेणाऱ्या इतर शहर प्रवासी यांचा समावेश आहे.

लीड अॅसिड बॅटरी ६०व्ही ३२एएच: किंमत ७१,५०० रुपये आणि ७२व्ही ३२एएच: किंमत ७४,००० रुपये तसेच लिथियम-आयन बॅटरी ६०व्ही ३०एएच: किंमत ८७,५०० रुपये आणि ७४व्ही ३२एएच: किंमत ९१,५०० रुपये या चार भिन्न प्रकारांमध्ये उपलब्ध असलेली एक्स-मेन २.० वापरकर्त्यांच्या विस्तृत श्रेणीची गरज पूर्ण करते.

एक्स-मेन २.० एक प्रभावी कामगिरी करते आणि तिला २५ किमी/तास उच्च गतीचा आणि एका चार्जवर १०० किलोमीटर पर्यंतच्या रेंजचा अभिमान आहे. तिची ६०/७२व्ही बीएलडीसी मोटर, प्रति चार्ज फक्त १.५ युनिट वीज वापरते, ज्यामुळे ती अत्यंत कमी ऊर्जा खर्च करते. एकूण ९० किलोग्रॅम वजन आणि १८० किलो लोडिंग क्षमतेसह, एक्स-मेन २.०, दैनंदिन प्रवासाच्या गरजा हाताळण्यासाठी तयार करण्यात आली आहे. 

चार्जिंगची वेळ बॅटरीच्या प्रकारानुसार बदलते, लिथियम-आयन मॉडेल्सना ४-५ तास लागतात आणि लीड अॅसिड मॉडेल्सना पूर्ण रिचार्ज होण्यासाठी ८-१०0 तास लागतात. ही स्कूटर हिरवा, पांढरा, रुपेरी आणि लाल यासह चार चैतन्यपूर्ण रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे रायडर्सना त्यांची शैली व्यक्त करण्याची संधी मिळते.

झेलिओ ईबाइक्सचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री. कुणाल आर्य म्हणाले, “लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटकडे ग्राहक झपाट्याने आकर्षित होत आहे कारण अधिक ग्राहकांनी कार्यक्षम, पर्यावरणपूरक शहरी वाहतुकीचे फायदे ओळखले आहेत. एक्स-मेन २.० सह, आम्ही कामगिरी, परवडणारी क्षमता आणि तंत्रज्ञान संतुलित करणारे उत्पादन निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

आमच्या प्रगत उत्पादन प्रक्रिया आणि सखोल संशोधनामुळे आम्ही, आजच्या शहरी प्रवाशांच्या गरजा पूर्ण करणारी, शैली, विश्वासार्हता आणि प्रभावी रेंज देणारी स्कूटर तयार करण्यात यशस्वी झालो आहोत.  आम्हाला विश्वास आहे की, एक्स-मेन २.० भारताच्या इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थेचा एक आवश्यक भाग बनत असलेल्या लो-स्पीड सेगमेंटमध्ये आमचे स्थानआणखी मजबूत करेल.”

एक्स-मेन २.० एक सुरळीत आणि सुरक्षित राइड सुनिश्चित करण्यासाठी प्रगत वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यात फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक, पुढील बाजूस अलॉय व्हील्स आणि मागील बाजूस हब मोटर आहे, जे सर्वोत्तम नियंत्रण आणि सुरक्षा प्रदान करतात.

स्कूटरचे पुढचे टेलिस्कोपिक आणि मागील स्प्रिंग-लोडेड शॉक अॅब्सॉर्बर असमान रस्त्यावरही आरामदायी प्रवास सुनिश्चित करतात. अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये अँटी-थेफ्ट अलार्म, सेंट्रल लॉकिंग, रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, ऑटो-रिपेअर स्विच, यूएसबी चार्जर आणि वापरकर्त्याच्या अधिक सोयीसाठी डिजिटल डिस्प्ले यांचा समावेश आहे.

या प्रभावी वैशिष्ट्यांसह, झेलिओ, लीड अॅसिड आणि लिथियम-आयन बॅटरी प्रकारांसाठी एक वर्ष किंवा १०,००० किलोमीटरची सर्वसमावेशक वॉरंटी देते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: