अहेरी – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी दिंनाक ०२/०९/२०२३ ला रंग शारदा सभागृह बांद्रा मुबंई येथे राज्यातील शिवसेना च्या पदाधिकारीनां होवु द्या चर्चा हा कार्यक्रम राबविन्याचे सुचना केल्या.
ह्या कार्यक्रमाचे द्वारे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असतांना जनतेसाठी केलेली लोकाभिमुख कामे व मागिल एक वर्षात घटनाबाह्य मिंदे सरकार ने केलेला राज्यातील जनतेचा वाटोळा हे गावागावांत जावुन शेवटच्या मानसापर्यत पोहचविण्याचे आदेश सर्व पदाधिकारींना दिलेले आहेत.
त्याचाच भाग म्हनुन अहेरि विधानसभा क्षेत्राचे युवा सेना अधिकारी दिलीप सुरपाम हे गावागावांत जात आहेत.
केलेल्या कामाचा आढावा व पुढील नियोजन याबाबत आज दिनांक ११/०९/२०२३ रोजी युवासेनेची बैठक आलापल्ली येथील विश्रामगृहात पार पडली.
याबैठकीस पक्ष संघटनेचा आढावा घेन्यात आला व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी दिलेले होवु द्या चर्चा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळेस आदित्य ठाकरे युवासेना प्रमुख यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवुन युवकांनी मोठ्या संख्येने युवासेनेत प्रवेश घेतला.
सदर बैठकीला बिरजु गेडाम शिवसेना अहेरी विधानसभा संघटक,उपजिल्हाप्रमुख राकेश मुन्नूरवार ,चंदना विष्णोई उपजिल्हा संघटीका(महीला),दिलीप सुरपाम युवासेना युवासेना अधिकारी,राकेश मुन्नुरवार युवासेना उप जिल्हाप्रमुख अहेरी विधानसभा हे प्रामुख्याने उपस्थित होते.