रामटेक – राजु कापसे
एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल खैरी परसोडा, रामटेक येथे युवा मंथन 20 झोनल मीटचे आयोजन जी 20 प्रमाणे 1 डिसेंबर ला संपन्न झाले. युवा मंथन- 20 मध्ये तामीलनाडू, महाराष्ट्रातील अजमेर सौंदाणे नाशिक, देवाडा चंद्रपुर, बोरगांव बाजार गोंदिया येथील एकलव्य माॅडेल रेसिडेंशियल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
युवा मंथन- 20 चे उद्घाटन खासदार कृपाल तुमाणे यांनी केले. यावेळी प्रामुख्याने आमदार आशिष जयस्वाल, अमितजी कातुरे,एटीसी टीडीडी नाशिकचे तुषार माळी, प्रोजेक्ट ऑफीसर टीडीडी नागपूरचे नितीन इसोकर, ईएमआरएस सेलचे हेड टी.कलाथिनाथन , एसएमसी अध्यक्ष राजकुमार नन्नावरे, प्राचार्य डॉ.समरीन कौसर, प्राचार्य रूपा बोरीकर व किट्स प्राचार्य डॉ.अविनाश श्रीखंडे सहित विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी खासदार कृपाल तुमाणे म्हणाले की एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल शाळेतर्फे जागतिक जी-20 सारखे वातावरण तयार केले आहे. विविध शाळेतून विद्यार्थी एकत्र आल्याने त्यांच्यामध्ये विविधता असून एकोपा दिसत आहे
आमदार आशिष जयस्वाल म्हणाले की विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. येथे आदिवासी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळत असल्याने भविष्यात चांगले विद्यार्थी घडतील.
जी-20 च्या प्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध देशाचे प्रतिनिधी बनून आपल्या देशाची कार्यप्रणाली सांगून विचार व्यक्त केले. टेक्नीकल इंवेंट करिता समन्वयक प्राचार्य रुपा बोरीकर, निलेश कुलकर्णी, अविनाश पवार, गजानन किनकर, शितल जाधव यांनी मार्गदर्शन केले.
प्रथम पारितोषिक अजमेर सौदाणे येथील विद्यार्थी, द्वितिय पारितोषिक देवाडा येथील विद्यार्थ्यांनी मिळविला. आयुक्त टीडीडी नाशिक नयना गुंडे यांनी ऑनलाईन व्हीसीद्वारे उपस्थित होवून विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले आणि नॅशनल स्तरावरील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वीतेकरीता मार्गदर्शन अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग कार्यालय नागपूर रविंद्र ठाकरे व प्रकल्प अधिकारी ए.आ.वि.प्र.नागपूरचे नितिन इसोकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन चारूलता सहारे व अविनाश पवार यांनी केले.
शाळेच्या प्राचार्या डॉ.समरिन कौसर तसेच शिक्षकवृंद राधिका गोळतकर, धनश्री दरणे, चारुलता सहारे, डॉ. मालती श्रीखंडे, सुजाता अर्जुने, दिपक हुकरे, विठ्ठल सपकाळ, गजानन धनगर, अविनाश ढवले, सुनिता शेबे, अनिकेत उईके, दिपाली उके, यामिनी शेमला, प्रेरणा थुंबे, ज्ञानेश्वर सोनटक्के,मिशन शिखरचे सर्व शिक्षक,दिपक पिलगेर व संगिता कोडवते यांनी प्रयत्न केले.