Sunday, December 22, 2024
Homeराजकीयग्रामपंचायत बोर्टाच्या निवडणुकीत युवा ग्राम विकास पॅनलची झाली सरशी...

ग्रामपंचायत बोर्टाच्या निवडणुकीत युवा ग्राम विकास पॅनलची झाली सरशी…

मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत बोर्टा येथे झालेल्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत बोर्टा येथील युवा ग्राम विकास पॅनल यांनी घवघवीत यश मिळवित एकतर्फा बाजी मारत सरपंचाची आरक्षित असलेल्या अनुसूचित जाती सर्वसामान्य प्रवर्गातून एकूण सात उमेदवार उभे होते.

त्यामधून युवा असलेले श्री पंकज ओंकारराव सावळे जनतेचा विश्वास जिंकत विजय मिळवला त्याचबरोबर सदस्यासाठी श्री सचिन शंकर होडकर,श्रीमती लताबाई कैलास गायकवाड, सौ.आरती गजानन गायकवाड, सौ.माधुरी संदीप तांबडे व श्री राजकुमार जानराव वानखडे निवडून येत युवा ग्राम विकास पॅनल चा विजय घडुन आणला व सात पैकी पाच जागा निवडून आणत युवा ग्राम विकास पॅनलनी विजयश्री मिळवत गावाचा विश्वास जिंकला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: