11 एप्रिलला पुसद प्रज्ञा पर्व 2023 कार्यक्रमात मध्ये प्रतिपादन…
विद्ये विना मती गेली | मती विना नीती गेली | नीती विना गती गेली
गती विना शूद्र खचले | एवढे अनर्थ एका अविद्येने केले
अश्या प्रकारे विषमतेच महात्म्य जोतिबा फुलेंनी विश्लेषण करून त्यावर उपाय म्हजणे शिक्षण शोधून स्वतः प्रथम शिकून नन्तर स्वतःच्या पत्नीला शिकविले आणि शूद्र, वंचीत,आणि पददलितांना शाळा काढून त्याद्वारे शैक्षणिक क्रांती घडवून आणली अश्या महान क्रांतिकारक समाजसुधारकास आपण वाचले पाहिजे त्यांच्या साहित्याला लोकांन पर्यंत पोहचविले पाहिजे अश्या प्रकारचे विचार प्रा.सय्यद सलमान सरांनी महात्मा फुलें जयंती निमित्ताने पुसद येथील प्रज्ञापर्व 2023 च्या वैचारिक जयंतीच्या कार्यक्रमास ठेवण्यात आले आहे.
या अकरा एप्रिलच्या प्रज्ञा पर्व कार्यक्रमात मा.नितीन चंदनशीवे सर हे सुद्धा वक्ते म्हणून लाभले होते व त्यांनी आंबेडकरी चवळीतील युवकांची भूमिका या विषयावर आपले मत व्यक्त केले. व आंबेडकरी युवकांनी डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांना समाजा पर्यंत पोहोचवावे अशी भूमिका मांडली तर प्रा.सलमान सरांनी सांगितले की,महात्मा फुलें फक्त फुले सामाजाचे नव्हे तर सर्व समतावादी लोकांचे आहे.
म्हणून महात्मा फुलेंना एका जाती पूरत मर्यादित ठेवण्यापेक्षा त्यांचे विचार व साहित्य हे सर्व लोकांपर्यत पोहोचविले पाहिजे तर खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंचे जयंती साजरी होईल.महात्मा फुलें ज्या काळात जन्माला आले त्या काळात खूपच अन्यायकारक परिस्थिती होती त्या मध्ये शूद्र आणि स्त्रियांना प्राण्यांपेक्षाही खूप हीनतेची वागणून दिली जात होती.
परंतु अश्या परिस्थिती महात्मा फुलेंनी शिक्षणाची ज्योत पेटवून त्यांनी समाजाला शिक्षित केले अश्या क्रांतिकारक महात्मा फुलेंच साहित्य युकानी वाचन फार आवश्यक आहे असं प्रतिपादन पुसद येथील प्रा.सय्यद सलमान सै शेरू यांनी केलं आहे. पुसद येथे दरवर्षी वैचारिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी प्रज्ञा पर्व आयोजित केला जातो या वर्षीच्या प्रज्ञा पर्वाचे अध्यक्ष किशोरदादा कांबळे आहे.या पर्वात सात एप्रिल पासून ते चौदा एप्रिल पर्यंत विविध समाज प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवले जाते.