नरखेड – ग्रामीण भागात प्रतिभेची कमी नाही, गरज आहे ती संधीची. संधी मिळाल्यास आम्ही सुद्धा कुनाहीपेक्षा कमी नसल्याचे प्रत्यंतर नरखेड येथे संपन्न झालेल्या आंतर शालेय व खुल्या झंकार बिट्स नृत्य स्पर्धेने सिद्ध केले. नरखेड युथ आर्गनायझेशन द्वारा आयोजित झंकार बिट्स नृत्य स्पर्धा स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेला स्पर्धकासह प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.
नगरपरिषद कार्यालयासमोरील पटांगणावर भव्य रंगमंचावर नरखेड सह मध्यप्रदेशातील पांढुरणा व अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील नृत्य समूहाने चार तास रंगत आणली. सुरवातीपासून शेवटपर्यंत विविध नृत्य समूहाने चार तास प्रेक्षकांना जकडून ठेवले होते. स्पर्धेचे सूत्र संचालन उदयन बनसोड यांनी केले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख , राहत देशमुख यांनी उपस्थित राहून नृत्याचा आनंद लुटला.
आंतर शालेय गटात आठ व खुल्या गटात दहा समूह स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. आंतर शालेय गटात स्वच्छ भारत अभियान ही थीम बहुतांश स्पर्धकांनी वापरली. आंतरशालेय गटात ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट नरखेड यांना महिंद्रा वासाडे यांचे कडून प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपये व मानचिन्ह, लिटिल फ्लॉवर स्कूल पांढुरणा यांना मनीष फुके यांचे कडून द्वितीय पारितोषिक सात हजार रुपये व मानचिन्ह व नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नरखेड यांना संदीप कठाने कडून तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये व मानचिन्ह देण्यात आले.
खुल्या गटात मशाल डान्स ग्रुप नरखेड यांना राहुल रेवतकर कडून प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपये व मानचिन्ह, एके डान्स ग्रुप नरखेड यांना मोहसीन शेख कडून द्वितीय सात हजार रुपये व मानचिन्ह व आरती डान्स ग्रुप नरखेड यांना डिगाम्बर नारनवरे कडून पाच हजार रुपये व मानचिन्ह देण्यात आले.
स्पर्धेदरम्यान शहरातील कचरा संकलन करणाऱ्या ४० कर्मचाऱ्यांचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते शाल व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पियुष चांडक, वर्षा ठाकरे व मयूर गांजरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेला उद्योजक गुड्डू बालपांडे, अँड भूषण ढोमने, श्याम नाडेकर, अनिल गजबे, संजय चरडे, शैलेश बागडे, रत्नाकर मडके ,सुनील बालपांडे, श्यामला नटराजन, भारती झामरे, लीना भालेकर, विजय काळकर, प्रतिभा जाउळकर, हेमंत ढोके, प्रशांत शेंडे प्रमुख उपस्थिती होते.
नरखेड नगरपरिषदेच्या विशेष सहकार्याने उदयन बन्सोड यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता पंकज क्षीरसागर, आकाश जवादे, राहुल कान्होलकर , गौरव पोतदार, सुशील डोंगरे, रितेश मूलताईकर यांचेसह उम्मीद फाउंडेशन चे गोलू सोमकुवर, संदीप कंठाने, निक्की पाटील , अंकुश खमारी यांनी परिश्रम घेतले.