Sunday, October 27, 2024
Homeराज्यअज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यु...रामटेक - तुमसर मार्गावरील खिंडसी येथील घटना...

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यु…रामटेक – तुमसर मार्गावरील खिंडसी येथील घटना…

रामटेक – राजू कापसे

दि. ५ ऑक्टोंबर ला विजयादशमीच्या दिवशी रामटेक – तुमसर मार्गावरील खिंडसी येथे सायंकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना घडली. लोकेश नंदकिशोर रहांगडाले वय २६ राहाणार नांदगाव, तालुका मौदा असे मृतक तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार लोकेश हा मुळचा रामटेक – भंडारा मार्गावरील कोदामेंढी पासुन अवघ्या २ कि.मी. अंतरावर असलेल्या नांदगाव येथील रहीवाशी असुन नंदकिशोर रहांगडाले यांना हा एक मुलगा व विवाहित मुलगी असे दोनच अपत्ये. लोकेश हा नागपुर ला काम करीत असल्याने नागपुरलाच राहात होता.

दरम्यान तो नांदगाव येथे असतांना दि. ५ ऑक्टोंबर ला मध्यप्रदेश येथील एका गावात मावशीकडे जाण्यासाठी निघालेला होता. मात्र खिंडसी दरम्यान त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली असता त्याचा जागेवरच मृत्यु झाला. रामटेक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला व रुग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदन गृहात पाठविला. पुढील तपास रामटेक पोलिस करीत आहे.

१४ ऑक्टोंबर ला होता नातवाचा नामकरणाचा कार्यक्रम
नंदकिशोर रहांगडाले यांना दोन अपत्य होती मुलगा लोकेश व एक मुलगी. मुलगा अविवाहीत तर मुलगी विवाहित होती व तिला नुकतेच बाळ झाले होते. तेव्हा त्या बाळाचा नामकरणाचा कार्यक्रम नुकत्याच येत्या १४ ऑक्टोबरला ठेवण्यात आलेला होता. मात्र नातवाच्या नामकरण सोहळ्याच्या पूर्वीच मुलाच्या मृत्यूच्या दुःखाचा डोंगर रहांगडाले परिवारावर कोसळले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: