बुलढाणा जिल्ह्यातील नायगाव देशमुख येथील युवक… परिसरात हळहळ, पोलीसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद
पातुर – निशांत गवई
पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सावरगाव शेतशिवारात विजेचा शाॅक लागून एका युवकांचा मंगळवारी दि.२६ डिसेंबर रोजी संध्याकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
एका व्यक्तीचे डाखोरे यांनी चार -पाच एकर बटाईन शेत केले असून शेतात नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या सुमारास डाखोरे हे जात होते. प्राप्त माहितीनुसार सावरगाव शिवारात शेतातील पिकांचे वन्यप्राण्यापासून रक्षण करण्याकरिता शेतकऱ्याने कुंपनात विद्यूत प्रवाह सोडला आहे.
त्यामुळे युवकास त्याचा जबर शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या गंभीर बाबीकडे एम एस सी बी ने शेतकऱ्यांनी असे प्रकार करू नये म्हणून लक्ष देण्याची गरज आहे. घटनेतील मयत वैजनाथ वासुदेव डोलारे वय २८ रा.नायगाव देशमुख जि.बुलढाणा पोलीसांना घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश महाजन सुधाकर करवते घटना स्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन साठी शासकीय रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले. पोलीसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आली असून मतक व्यतीच्या पश्चात दोन मुले पत्नी आई वडील लहान भाऊ असा परिवार आहे.
काही ठिकाणी असे निदर्शनास आले की शेतकरी प्राण्यापासून पिकाच्या संरक्षणासाठी शेताला एकेरी तारेचे कंपाउंड करून तारेला करंट लावतात त्यामुळं प्राण्याच्या तसेच मनुष्यच्या जीवितास धोका होऊन अनर्थ प्रकार घडतो.असा प्रकार करणे चुकीचे आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आसा प्रकार करू नये. गणेश महाजन उपनिरीक्षक चान्नी पो. स्टेशन