Thursday, December 26, 2024
Homeराजकीयखड्ड्यांसाठी युवक काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन...

खड्ड्यांसाठी युवक काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन…

रामटेक – राजु कापसे

पारशिवनी ते आमडी फाटा दरम्यानच्या महामार्गावर नयाकुंड गावाजवळील पेंच नदी पुलावर मोठया प्रमाणात खड्डे पडल्या कारणाने रामटेक विधानसभा युवक काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करुन रोष व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी रामटेक युवक काँग्रेस तर्फे निखील पाटील अध्यक्ष रामटेक विधानसभा युवक काँग्रेस, सचिन सोमकुवर, सौ मंगलाताई निंबोणे सभापती पंचायत समिती पाराशिवनी, सदर ठिकाणी एनएचएआय चे इंजिनीयर श्री ठाकरे साहेब व तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री पागोटे साहेब उपस्थित होते,

त्यांनी आंदोलन करते यांना सदर खड्डे वेळोवेळी बुजवून पावसाळा संपताच डांबरीकरण करून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गायकवाड साहेब कन्हान विभाग यांचे मार्गदर्शनाखाली योग्य पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी किशोर निंबोने, प्रज्वल मेश्राम, मयुर साबरे, शुभम वाघमारे आदी पदाधिकारी तसेच गावकरी उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: