पातूर – निशांत गवई
अकोला मार्गांवर असलेल्या माऊली बार पुढे असलेल्या मानमोडे यांच्या शेतात असलेल्या निंबा च्या झाडाला एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्या चि घटना आज दिनांक 2 जून च्या सकाळी उघडकीस आली याबाबत सविस्तर वृत्त असे कि स्थानिक पाटील मंडळी येथील युवा यश किसन उंबरकर वय अंदाजे 21 हा युवक ऑटो चालवीन्या चा व्यवसाय करीत होता आज सकाळी त्याने घरून ऑटो काढून व्यवसाय संबधी घरून बाहेर पडला मात्र त्याच्या मनात काय सुरु आहे.
याची तिळमात्र कल्पना घरच्या सदस्यांना नव्हती यश उंबरकर याने अकोला मार्गांवर असलेल्या माऊली बार समोर असलेल्या मानमोडे यांच्या शेतात असलेल्या निंबा च्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली सदर घटनेची माहिती शहरात पसरताच नागरिकांनि घटनास्थळ कडे धाव घेतली तर ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शन खाली सहा.
ठाणेदार गजानन पोटे, हे, कॉ. राठोड मेजर, प्र. वि. शिरसाठ, श्रीकांत पातोंड, आदी. नि पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणी साठी अकोला कडे रवाना करण्यात आला असून वृत्त लिहेस्तोवर पातूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.