“दारूबंदी”
रेला रे रेला रे! कोण केला
आमच्या हा आदिवासी जिल्हा ओ ओ…
आमच्या हा आदिवासी जिल्हा!! धृ !!
बंधन आहे पिण्यासाठी! काढण्याऱ्याची हिम्मत मोठी!!
काढतो म्हणे स्वतःसाठी! हुकूम नाही विकासाठी!!
गल्लो गल्ली फिरतो पिणेवाला !!
रेला रे रेला…
बंद झाली सरकारी! चालु झाली घरो घरी!!
चक्रा मारतो अधिकारी कडक शाशन शिक्षा भारी!!
दिसत नाही पिणे, विकणे वाला!!
रेला रे रेला…
सरकारांनी केली बंद! कित्येकानी सोडला छन्द!!
आकडा वाढला पिणाऱ्यांचा!बंदी कायदा कागदावरचा!”
बंधण नाही गुड अन मोहाला!!
रेला रे रेला…
क्लाराची कला न्यारी! बारा महिने मिडते ताडी!!
ताडी मध्ये नशा भारी! पिण्याऱ्याची हौस पुरी!!
त्याला कोण बंदी करणे वाला!!
रेला रे रेला…
साधुसंत संगतीजण! दारू पिन सोडुन द्याना!!
घरो घरी धिंगाला दारो दारी मुलांना!!
सोढून गेला भला व्येसण वाला!!
रेला रे रेला…
आपला
हिरामण तिवाडे अध्यक्ष गुरुदेव सेवा, मंडळ आलापल्ली