Saturday, November 23, 2024
HomeMarathi News Todayयवतमाळ | रस्त्यावर स्फोट झाला की काय?...घटना सीसीटीव्हीत कैद....

यवतमाळ | रस्त्यावर स्फोट झाला की काय?…घटना सीसीटीव्हीत कैद….

यवतमाळ शहरात गेल्या शनिवारी मोठी घटना CCTV कॅमेर्यात कैद झाली, रस्त्यावर असा अपघात झाला. शहरातील एका रस्त्याची भूमिगत पाइपलाइन अचानक फुटली. आश्‍चर्याची बाब म्हणजे पाण्याचा दाब इतका जास्त होता की त्यामुळे रस्ताही उखडला. क्षणभर त्सुनामी आल्यासारखे वाटले. रस्त्याचे तुकडे पाण्यासह 15 फुटांपर्यंत फेकले गेल्याने या दाबाची तीव्रता किती आहे, याचा अंदाज लावता येतो. यवतमाळमधील मिंडे रोड चौकात ही धक्कादायक घटना घडली.

या घटनेमुळे रस्त्यावरून जाणारी स्कूटी स्वार महिलाही जखमी झाली. पाण्याच्या दाबाने रस्ता उखडल्याचे संपूर्ण दृश्य तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

रस्ता उखडल्याचा आवाजही टिपण्यात आला
या घटनेची प्रत्यक्षदर्शी पूजा बिस्वास हिने दिलेल्या माहितीनुसार, ती मोबाईल फोनवर बोलत असताना अचानक पाण्याच्या दाबाने रस्त्याच्या आतील पाइपलाइन फुटल्याचे तिने पाहिले. यानंतर काही वेळातच सर्वत्र पाणी साचले. यासोबतच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्ता तुटल्याचा आवाजही कैद झाला आहे. हे सर्व इतक्या लवकर घडले की लोकांना काहीच समजले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळमध्ये अमृत योजनेअंतर्गत ही पाइपलाइन टाकण्यात आली होती. मात्र, पाण्याच्या दाबाने पाइपलाइन फुटली. त्यानंतर रस्ता उखडून पाईपलाईनचे पाणी बाहेर आले. अमृत ​​योजनेच्या कामात गडबड झाल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: