Tuesday, July 16, 2024
spot_img
HomeBreaking Newsयवतमाळ । संदीप तोटेवर गोळ्या झाडून केली हत्या !...दारव्हा बस स्थानक चौकातील...

यवतमाळ । संदीप तोटेवर गोळ्या झाडून केली हत्या !…दारव्हा बस स्थानक चौकातील खुनी थरार…

याच संदीप तोटेने माजी नगरपरिषद उपाध्यक्ष सुभाष दूधे याची हत्या केली होती

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील बस स्थानकाच्या जवळ थरारक हत्याकांड घडलं. संदीप तोटे या युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना घडली असून, यात संदीप तोटे हा जागीच ठार झाला आहे, या हत्याकांडाची बातमी पसरातच शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून यात आजू एकही आरोपी अटक झाला नसल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार सदर हल्ला हा पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा या घटनेशी संबंध असण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्या अनुषंगाने पोलीसांनी तपास सुरु केलाय.

यवतमाळच्या दारव्हातील बस स्थानकाजवळ सुंदीप तोटे या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जीवघेण्या हल्ल्यात संदीप तोटे हा जागीच ठार झाला. या घटनेनंतर ठार झालेल्या युवकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी एकच टाहो फोडला.

हत्या करण्यात आलेला युवक हा देखील एका हत्या कांडातील प्रकरणाचा आरोपी असल्याची माहिती समोर आलीय. सुभाष दुधे यांची 2018 साली यवतमाळमध्येच हत्या करण्यात आली होती. त्या हत्याकांड प्रकरणात संदीप हा आरोपी होती.

सुभाष दुधे यांनी 2018 साली दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली. सुभाष दुधे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी संदीपाचाही खून करण्यात आला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केलीय.

सुभाष दुधे हे दारव्हा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष होते. 2018 साली त्यांची दगडाने ठेचून हत्या झाल्याचं उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे 2018 या वर्षी नवरात्रोत्सवाच्या काळातच दुधे यांचा खून करण्यात आला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: