यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान….
नागपूर – शरद नागदेवे
नागपूर -हिगंणा-भौतिक विकासाबरोबर समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याचा दृष्टिकोन बाळगणे व त्यातून विकासाचा समतोल साधने, सामाजिक जीवनात जीवन जगत असताना कुठे काय बोलावे व काय बोलू नये याचे तारतम्य बाळगणे, अगदी शालेय जीवनापासून स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असणारे यशवंतराव चव्हाण यांच्या या विचारांची आज वृत्तांत गरज आहे असे प्रतिपादन निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जिल्हा केंद्र नागपूर द्वारा यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सेंड पॉल विद्यालय येथे यशवंतरावांचे कर्तृत्व या विषयावरील व्याख्या कार्यक्रमात बोलताना केले.
पुढे बोलताना अपराजित यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विविध अंग उलगडून श्रोत्यांसमोर मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण विभागीय केंद्राचे माजी अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री रमेशचंद्र बंग हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी सेंड पॉल शाळेचे संचालक राजाभाऊ टाकसांडे, , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष अर्चना हरडे, सुरेंद्र मोरे, संतोष नरवाडे,प्रेम लुनावत ,श्रीराम काळे, प्रकाश इटनकर, रवींद्र देशमुख, डॉ अनुजा नारनवरे, अनिल इदाणे, उल्लास मोगलेवार, निलेश खांडेकर , नीला निकम,शेल जैमिनि,रूपा मोरे आणि प्रामुख्याने उपस्थित होते.
अध्यक्ष भाषणात डॉ.गिरीश गांधी यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील दुर्लक्षित बाबींवर भाष्य करून त्यांचे कुटुंब वत्सल मन श्रोत्यांसमोर ठेवले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव प्रतीक्षा जिल्हा केंद्र नागपूरचे अध्यक्ष महेश बंग यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. मंजुषा सावरकर यांनी तर आभार डॉ. कोमल ठाकरे यांनी मानले