Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनयशराज मुखाटे आता "एक दोन तीन चार" या चित्रपटाने मराठी सिनेश्रुष्टीत म्युझिक...

यशराज मुखाटे आता “एक दोन तीन चार” या चित्रपटाने मराठी सिनेश्रुष्टीत म्युझिक डिरेक्टर म्हणून करतोय पदार्पण!!

“रसोडे में कौन था?” या एका इंस्टाग्राम रील वरून घराघरात पोहोचलेला सोशियल मीडिया स्टार यशराज मुखाटे आता “एक दोन तीन चार” या चित्रपटाने मराठी सिनेश्रुष्टीत म्युझिक डिरेक्टर म्हणून करतोय पदार्पण!!

मुंबई – गणेश तळेकर

व्हायरल कन्टेन्ट पासून कमाल गाणी आणि म्युझिक बनवून यशराज मुखाटे ने आतापर्यंत भरपूर फेम मिळवलाय. टीव्ही शो च्या प्रसिद्ध डायलॉग्स चे रॅप बनवून त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातत दर्शकांची मनं जिंकली. बघता बघता तो सोशल मीडिया स्टार झाला. प्रेक्षकां सोबतच इंडस्ट्री मधल्या कलाकारांनी सुद्धा त्याच्या ह्या टॅलेण्टचं कौतुक केलं आणि त्याच्या टॅलेंटच्या हिमतीवरच आज यशराज एक पाऊल पुढे टाकतोय.

होय आता त्याच्या चाहत्यांसाठी खूप मोठी खुशखबर आहे कारण यशराज मुखाटे म्युझिक डिरेक्टर म्हणून मराठी इंडस्ट्री मध्ये पदार्पण करतोय. जिओ स्टुडिओजच्या, वरूण नार्वेकर दिग्दर्शिक ‘एक दोन तीन चार’ ह्या चित्रपटाच्या शिर्षक गीताला यशराज ने कंपोज केलय. ह्या गाण्याचं नाव आहे “लवचुंबक लोचे”. गाण्याचे बोल अगदी युनिक आहेत जे अक्षयराजे शिंदे यांनी लिहिले आहेत. हे गाणं सिनेमाच्या अगदी टर्निंग पॉईंट वर आधारित आहे.

चित्रपटात मुख्य भूमिकेत वैदेही परशुरामी आणि निपुण धर्माधिकारी व्यतिरिक्त मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर आणि करण सोनावणे यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. सायली आणि समीरच्या आयुष्यात अशी कोणती गुगली पडते की ज्यामुळे त्यांचे लवचुंबक लोचे झाले हे पाहण्यासाठी १९ जुलै ची वाट पाहावी लागणार.

‘एक दोन तीन चार’ या हलक्या फुलक्या विनोदी, कौटुंबीक ड्रामा असलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन ‘मुरांबा’ फेम दिग्दर्शक वरूण नार्वेकर यांनी केलं आहे. तर या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी मिळून लिहिले आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तूत, या चित्रपटाची निर्मिती, ज्योती देशपांडे, रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांनी केली आहे. सायली आणि सम्याच्या प्रेमात पडलेली गुगली ते झाले लवचुंबक लोचे चा प्रवास पाहण्यासाठी १९ जुलै ला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात नक्की भेट द्या.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: