सदस्य व आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी वापर केला गेला…
वुलिंग मोटर्स (वुलिंग)ने ऑफिशियल कार पार्टनर म्हणून देशासाठी त्यांची पहिली इलेक्ट्रिक वेईकल एअर ईव्हीच्या माध्यमातून इंडोनेशियामधील जी२० समिटच्या भव्य इव्हेंटला पाठिंबा दिला. बाली बेटावर एअर ईव्हीचे तब्बल ३०० युनिट्स दाखल झाले आणि जी२० सदस्य व आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी वापरण्यात आले. ३०० एअर ईव्ही युनिट्सचे लक्ष वेधून घेणारे एक वेगळे पण आहे, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील इव्हेंटमध्ये वुलिंग इलेक्ट्रिक कारच्या सहभागाची ओळख म्हणून खास डिझाइन केलेल्या लिव्हरीचा वापर करण्यात आला.या कॉम्पॅक्ट-आकाराच्या इलेक्ट्रिक कारला शोभणाऱ्या दोन भिन्न डिझाइन्स आहेत.
दोन्ही डिझाइन्सचे आपापले अर्थ आहेत. जी२० समिट ऑफिशियल कार पार्टनर ऑन एअर ईव्हीची ओळख म्हणून जोडलेल्या स्टिकरचे पहिले डिझाइन मेगामेंडुंग बाटिक शैलीतून घेतले होते. सिरेबॉनचा हा बाटिक पॅटर्न कारच्या पृष्ठभागावर लाल व नारिंगी रंगाचा अनुभव आणि पुढच्या बाजूला काही क्लाउड पॅटर्न देतो. या क्लाउड मोटिफमागील तत्त्वज्ञान म्हणजे स्वातंत्र्य, मैत्री आणि शांतता. हे एअर ईव्ही नावाच्या अर्थाशी सुसंगत आहे, जे इंग्रजीतून घेतले आहे आणि ज्याचा अर्थ मुक्तपणे फिरणारी हवा आहे.
मेगामेंडुंग मोटिफ व्यतिरिक्त जी२० ची ऑफिशियल कार पार्टनर वुलिंग एअर ईव्हीवर इंडोनेशियामधील विविधतेचे प्रतीक दाखवणारी झलक देखील समाविष्ट करण्यात आली आहे. हे राष्ट्रीय स्मारक (मोनास), प्रंबनन मंदिर परिसर, पेनाटरन अगुंग लेम्पुयांग मंदिर यांसारख्या देशातील अनेक प्रतिष्ठित इमारतींच्या छायचित्रांमधून दिसून येऊ शकते.
हे विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे. तसेच शुद्ध भविष्याच्या दिशेने वाटचालीचे प्रतीक महणून ‘शेपिंगक्लीनटुमारो’ असे वाक्य देखील प्रिंट करण्यात आले.मागील बाजूस दोन डिझाइन्समध्ये विभिन्न पॅटर्न्स व रंग आहेत, पण लेखन एकाच स्वरूपाचे आहे. प्रथम म्हणजे ‘टूगेदर फॉर द सस्टेनेबल फ्यूचर’असे वाक्य आहे, ज्याचा अर्थ असा की वुलिंग एअर ईव्हीच्या माध्यमातून अधिक शाश्वत भविष्यासाठी पर्यावरणास अनुकूल गतीशीलता सोल्यूशन्स देते.