अमरावती ग्रामीण घटकामध्ये पोलीस शिपाई भरती २०२१ पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या १८६३ उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक ०२/०४/२०२३ रोजी सकाळी ८.३० वा. १) व्ही. एम. व्ही. कॉलेज, कठोरा रोड, अमरावती २ ) श्री समर्थ हायस्कूल, बडनेरा रोड, देवरणकर नगर, अमरावती ३) मणीबाई गुजराती हायस्कूल, अंबापेठ, अमरावती ४) नारायणदास लढढा हायस्कूल, रविनगर, अमरावती येथे घेण्यात येणार आहे.
लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फेत ऑनलाईन पध्दतीने डाउनलोड करण्यास उपलब्ध आहे. सदर परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी सकाळी ६.३० वाजता पोहचणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर प्रवेश पत्र व २ पासपोर्ट साईज फोटो वगळता इतर साहित्य घेवुन जाण्यास प्रतिबंध आहे. या संदर्भात उमेदवारांना काही अडचण / समस्या असल्यास त्यांनी समाधान कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती ग्रामीण येथे संपर्क साधावा.
संपर्क साधण्यासाठी ठिकाण…पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती ग्रामीण
संपर्क क्रमांक
९१४६५०३३४९