Saturday, November 23, 2024
Homeखेळसांगलीत रविवारी रंगणार कुस्त्यांचे मैदान...

सांगलीत रविवारी रंगणार कुस्त्यांचे मैदान…

सांगली – ज्योती मोरे.

ट्रबल शुटींग सोशल वेलफेअर फॅडिशन व कुस्ती प्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित रविवार २६ रोजी सायंकाळी पाच वाजता कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात येत असल्याची माहिती आयोजकानी दिली. यावेळी पै. शशिकांत कुंभार, बाळासाहेब कुमे, शरद देशमुख, अविनाश काकडे, जॉर्ज पिंटो, विशाल झांबरे आदी उपस्थित होते.

या स्पर्धा आयर्विन पुलाजवळील सरकारी घाट येथे होणार असून, प्रथम व -मांकाची कुस्ती कै. पै. कोटगोंडा पाटील (इंडिया) यांच्या स्मरणार्थ सुजित हांडे (पाटील) व अजित हांडे (पाटील) यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आली आहे. ही कुस्ती गंगावेस तालीम कोल्हापूरचा पै. सिंकदर शेखर (महानभारत केसरी) व पंजाबचा पै. गुरुप्रित सिंग (भारत केसरी) यांच्यात रंगणार आहे. यासाठी अडीच लाख रुपये पारितोषिक व छत्रपती शिवाजी महाराज चषक देण्यात येणार आहे.

द्वितीय क्रमांकासाठी दोन कुस्त्या होणार असून, पै. भारत मदने व बाला रफिक आणि पै. सुदेश ठाकूर व पै. संतोष दोरवड यांच्यात रंगणार आहेत. यासाठी दीड लाखाचे दोन पारितोषिक व शिल्ड आहे. तसेच तृतीय क्रमांकाची कुस्ती पै. सुबोध पाटील व पै. राजेंद्र सुळ यांच्यात होणार असून, यासाठी एक लाखाचे पारितोषिक व शिल्ड आहे. चतुर्थ क्रमांकासाठी पै. अरुण बोंगार्डे व पै. संदिप मोटे यांच्यात कुस्ती रंगणार असून, यासाठी 80 हजारचे पारितोषिक व शिल्ड देण्यात येणार आहे. याशिवाय 100 हुन अधिक छोट्या मोठ्या कुस्त्या व महिला कुस्त्याही होणार आहेत.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आयुक्त सुनिल पवार, उपायुक्त राहुल रोकडे, एलसीबीचे ए. पी. आय. प्रशांत निशानदार, शहर पोलिस स्टेशनचे पी. आय. अभिजीत देशमुख, शहर कार्यकारी अभियंता आप्पासाहेब खांडेकर आदींसह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

याचे आयोजन पै. शशिकांत कुंभार (वस्ताद), जॉर्ज पिंटो, शरद देशमुख, राजु बावडेकर, अविनाश काकडे, नितिन दौडमणी, विशाल झांबरे, बाळासाहेब कुमे, योगेश सुर्यवंशी, सुनिल परमने, महेश शिंदे, राजकुमार घुगरे, अजय पवार, प्रदीप जगदाळे, सचिन चव्हाण, महेश नागे, गुलाब पाटील, हरी माळी, तानाजी सुतार, कुमार कलगुडगी, विपुल केरिपाळे, विजय साळुंखे, युसुफ आत्तार, जावेद जांबेळकर, पृथ्वीराज कदम यांनी केले आहे. निवेदन पै. शंकर पुजारी हे करणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: