मुंबई – जगविख्यात बौद्ध धर्मगुरु महाथेरो अजाय जयासारो हे थायलंड येथून भारतच्या भेटीसाठी येणार आहेत. या भेटीदरम्यान ते मुंबईतील बौद्ध धर्माच्या अनुयायांना भेट देणार आहेत.यावेळी ग्लोबल मेत्ता फाउंडेशनच्या वतीने रविवार १५ जानेवारी रोजी दादर शिवाजी मंदिर येथे भिक्खू संघासाठी चिवरदान करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आले आहे.तसेच यावेळी महाथेरो अजाह्य जयासारो यांच्या धम्मावर आधारित मराठी अनुवादीत पुस्तकांचा प्रकाशन देखील होणार आहे, यावेळी कार्यक्रम अनेक आय पी एस व इतर क्षेत्रातील अधिकारी उपस्थित राहणार आहे,