मुंबई – गणेश तळेकर
“मराठी नाट्य कलाकार संघाच्या वतीने २०१४ सालापासून जागतिक रंगकर्मी दिवस साजरा केला जातो, रंगभूमीवर प्रामाणिक प्रेम करणाऱ्या सक्रिय रंगकर्मींचाही हक्काचा एक दिवस असावा, या उद्दिष्टाने ज्यांनी रंगभूमीवर सर्वस्व वाहिले आहे, अशा भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून २५ नोव्हेंबर हा दिवस “जागतिक रंगकर्मी दिवस” म्हणून साजरा केला जातो,
यादिवशी एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मींचा सत्कार करून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यात येते. यंदा आपल्या सर्वांच्या लाडक्या “आऊ” श्रीमती उषा नाडकर्णी यांचा सन्मान करण्यात येणार असून मुलाखतीतून ‘आऊं’शी संवाद साधला जाणार आहे. सदर जागतिक रंगकर्मी दिवस सोहळा शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी दामोदर नाट्यगृह परळ येथे सायं.०६ वा. आयोजित करण्यात आला आहे, यानिमित्त श्री.ज्ञानेश पेंढारकर यांचा सांगीतिक कार्यक्रम सादर होईल.
हा जागतिक रंगकर्मी दिवस सोहळा आपण सर्व कलाकारांनी एकत्र येऊन साजरा करावा हा संघाचा मानस आहे, आपल्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांची उपस्थिती प्रार्थनीय असून आपण या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे, ही विनंती.! धन्यवाद.! आपले नम्र, सुशांत शेलार अध्यक्ष, शरद पोंक्षे उपाध्यक्ष, उमा बापट कोषाध्यक्षा, विजय सूर्यवंशी
प्रमुख कार्यवाह, शिवाजी शिंदे सह कार्यवाह.