Monday, December 23, 2024
HomeHealthWorld Heart Day | कोविड-१९ मधून वाचलेल्या व्यक्तींनी हृदयाची अधिक काळजी घेणे...

World Heart Day | कोविड-१९ मधून वाचलेल्या व्यक्तींनी हृदयाची अधिक काळजी घेणे आवश्यक…

कोविड-१९ निदान झालेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता २१ पट अधिक…

World Heart Day – कोविड-१९ मधून वाचलेल्या व्यक्तींना त्यांच्या फुफ्फुसांच्या आरोग्यावर या आजाराच्या दीर्घकालीन परिणामाबाबत चिंता लागून आहे. संशोधक व डॉक्टरांनी आता चेतावनी दिली आहे की, या व्यक्तींनी त्यांच्या हृदयाची देखील अधिक काळजी घेतली पाहिजे. आपल्या शरीररात फुफ्फुस व हृदय एकमेकांच्या जवळ स्थित आहेत.

नुकतेच युकेमधील जर्नल ‘सर्क्युलेशन’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार निदर्शनास आले की, कोविड-१९ सह निदान झालेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता २१ पट अधिक आहे, ज्यामुळे जीवघेण्या रक्ताच्या गाठी होण्याचा धोका वाढला आहे.

या अभ्यासाने दोन अवयवांमधील दुव्याकडे नव्याने लक्ष वेधले आहे, इतके की भारतातील डॉक्टरांनी आता असे म्हटले आहे की दमा, आयएलडी (इंटरस्टिशियल लंग डिसीज) आणि सीओपीडी (क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) यांसारख्या गंभीर फुफ्फुसाच्या आजारांसह निदान झालेल्या रूग्णांनी कार्डियक तपासणी केली पाहिजे.

जेनवर्क्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गणेश प्रसाद म्हणाले, ‘’जेनवर्क्स सोल्यूशन्स केअर सायकल गरजांचे निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करतात. कोविडनंतर हृदय व फुफ्फुसांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे आणि हृदय व फुफ्फुसाच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मास्टर हेल्थ चेक-अपचा भाग म्हणून निदानामध्ये हृदयाची तपासणी शेवटच्या टप्प्यामध्ये केली जात होती.

आपण आजही जुन्या स्पायरोमीटर पद्धतीचा वापर करतो, जी फक्त वरील श्वसनमार्गाची तपासणी करते आणि वापरण्यास अत्यंत अवघड आहे. फुफ्फुसाची तपासणी सुलभ करण्यासाठी निदानामध्ये लंग डिफ्यूजन टेस्ट्सचा समावेश करण्याची हीच योग्य वेळ आहे. दर्जात्मक स्पायरोमीटर, ६-मिनिटे वॉक टेस्ट किंवा लंग डिफ्यूजन टेस्टिंग वेलनेस प्रोग्रामचा महत्त्वपूर्ण भाग आहे.’’

‘’आपल्या शरीरातील सर्वाधिक रक्ताभिसरण फुफ्फुस व हृदयामध्ये होते. तरीदेखील उपचाराच्या वेळी या दोन्ही अवयवांमधील दुव्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते,’’ असे चेस्ट कौन्सिल ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि रांची, झारखंड येथील कन्सलटण्ट पल्मोनोलॉ‍जिस्ट डॉ. अत्री गंगोपाध्याय म्हणाले.

‘’एखाद्या व्यक्तीला फुफ्फुसाचा आजार झाला तर फक्त फुफ्फुसावर उपचार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. त्याचप्रमाणे हृदयविषयक आजार झाला तर फक्त हृदयावर उपचार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. पण हृदय व फुफ्फुसं या दोन्हींमुळे संबंधित आजाराची लक्षणे उद्भवू शकतात याबाबत क्वचितच विचार केला जातो,’’ असे डॉ. गंगोपाध्याय म्हणाले.

कोविड-१९ मुळे ग्रस्त आणि बरे होणाऱ्या लोकांमध्ये अनपेक्षित हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत असताना डॉक्‍टरांच्‍या मते, या अवयवांची वेगळी तपासणी करण्याची पद्धत लवकरच संपुष्‍टात येईल.  ‘’आपल्या शरीरामध्ये कोणतीही शारीरिक संस्‍था वेगळी नाही, त्या सर्व एकमेकांशी संलग्न आहे. एका शारीरिक संस्थेचा परिणाम दुसऱ्या शारीरिक संस्थेवर होतो. आपल्या शरीरामध्ये हृदय व फुफ्फुसं यांच्यामध्ये सर्वात घनिष्ट संबंध आहे.

ते एकाच रक्तवाहिन्यासंबंधित संस्थेचे भाग आहेत. महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आणि कोविड-१९ च्या डेल्टा व्हेरिएंटच्या प्रादुर्भावादरम्यान, व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा मृत्यूचा धोका १० पटीने वाढला. कोविड-१९ दरम्यान आम्ही दोन गोष्टी पाहिल्या. कोविडमधून बरे झाल्यानंतर किंवा कोविड आजार झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रमाणात वाढ झाली असे बेंगळुरू येथील मणिपाल हॉस्पिटलमधील कार्डियोलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. राजन शेट्टी म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: