कोगनोळी – राहुल मेस्त्री
धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने निपाणी तालुक्यातील मांगुर येथे भव्य विश्व धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, परिषदेचे उद्घाटक ऍड. सुषमाताई अंधारे या असणार आहेत तर जेष्ठ विचारवंत आणि माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. परिवर्तनवादी चळवळीतील नेते अनिल म्हमाने हे ह्या धम्म परिषदेचे अध्यक्ष असतील. तर प्रा. डॉ. कपिल राजहंस हे स्वागताध्यक्ष असतील.
डी. जी. राजहंस मेमोरियल फाऊंडेशन कडून ह्या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पहिल्या सत्रात भदंत आर. आनंद थेरो, भदंत एस संबोधी थेरो, भदंत पैयावाज्जेरो, भदंत राहुल जी यांच्या हस्ते धम्म ध्वज रोहन आणि बुद्ध पूजा संपन्न होईल. त्यानंतर पहिल्या सत्रात भंते गण यांची देसना आणि उद्घाटन सोहळा होईल
दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. अमर कांबळे, तिसऱ्या सत्रात डॉ. प्रशांत गायकवाड, तिसऱ्या सत्रात संग्राम सावंत आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. ह्यावेळी सीमाभागात आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या योद्ध्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
सदर धम्म परिषदेला आमदार राजीव आवळे, प्रदीप जाधव, पवन पाटील, अन्नासो जळणे, प्रा. सुरेश कांबळे, स्वप्निल राव माने सरकार आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. सदर धम्म परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक प्रा. मिनल राजहंस, निखिल राजहंस, डॉ. जयंत कांबळे, सुकुमार कांबळे यांनी केले आहे.