अतुल दंढारे –नरखेड (नागपुर):-04
नरखेड पेठ विभाग दुर्गा माता मंदिर सभागृहांत जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने दिव्यांग आघाडी तर्फे दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस यांनी केली. या विभागासाठी २०६३ पदांची निर्मिती करण्यात आली असून ११४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मेळाव्यात महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटक तथा भाजपा नगर विकास जिल्हा महामंत्री मनोज कोरडे यांनी दिव्यांगांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या जीवनाचा आलेख उंचावण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, दिव्यांगाच्या विविध योजना व सवलती याविषयी दिव्यांगांना माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शामराव बारई यांनी दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी भाजप कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. जबरदस्त इच्छाशक्ती व कठोर मेहनतीच्या जोरावर दिव्यांग बांधव प्रचंड यश मिळवू शकतात याची प्रेरक उदाहरणे दिली.
दिव्यांग आघाडीचे जिल्हा महामंत्री रमेश क्षिरसागर यांनी जागतिक दिव्यांग दिनाचे महत्त्व सांगितले.या कार्यक्रमास माजी नगरसेवक प्रशांत खुरसंगे, माजी उपाध्यक्ष सुभाष राय, माजी नगरसेवक धनराज खोडे, समाजसेवक दीपक ढोमने, जिल्हा महामंत्री राजेश क्षिरसागर, लीलाधर रेवतकर, विठ्ठलजी बालपांडे, सुरज झाडे, प्रशांत बालपांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक भाजपा कार्याध्यक्ष प्रमोद वैद्य व सूत्रसंचालन महामंत्री अशोक कळंबे तर आभार प्रदर्शन मोहन बारमासे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण बालपांडे, निलेश जुनघरे,आशा ढोके, सुषमा पिंजरकर, अजाबराव श्रीरामे, वैशाली पाटील व अनेकांनी सहकार्य केले.