दिव्यांग कर्मचाऱ्यांनी कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा; मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी…
अमरावती – दिव्यांग कर्मचाऱ्यांचे हक्क, सन्मान आणि कल्याण साधण्यासोबतच शासनाने त्यांना प्रशासनात समान दर्जा दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कायम सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आपली जबाबदारी पार पाडावी असे प्रतिपादन करत मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी महावितरणमधील दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
विद्युत भवनात आज ३ डिसेंबर हा “जागतिक दिव्यांग दिन” साजरा करण्यात आला. त्यानिमित्त मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, सहाय्यक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, कार्यकारी अभियंते प्रदिप पुनसे, राजेश माहुलकर,
अमित शिवलकर, अनिरूध्द आलेगावकर, रविंद्र चौधरी, संजय सराटे, अमित बुटे, उपविधी अधिकारी प्रशांत लहाने, वरीष्ठ व्यवस्थापक विजय पचारे, व्यवस्थापक कल्पना भुले, यज्ञेश क्षीरसागर, अतीरिक्त कार्यकारी अभियंता विलास शिंदे, बिपीन श्रीराव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्य अभियंता म्हणाले की, शारीरीक दिव्यांग हे मानसाच्या हातात नसते किंवा शारीरीक दिव्यांगावर पर्यायाने मात करता येते. परंतू मानसिक दिव्यांग हे नकारात्मक भावनेतून निर्माण होते. त्यामुळे नकारात्मकता सोडून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने आणि सकारात्मकतेने जगण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी अधीक्षक अभियंता दिपक देवहाते यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उपस्थितांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांशी संबंधित समस्या असल्यास त्या तत्परतेने सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच कर्मचाऱ्यांना समस्या दाखल करता याव्यात यासाठी कार्यालयात विशेष नोद रजिस्टरही तयार करण्यात आले. दिव्यांग कर्मचारी यांच्यावतीने अतीरिक्त कार्यकारी अभियंता विलास शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची रूपरेषा आणि पार्श्वभूमिची माहिती प्रास्ताविकाव्दारे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी मांडली आणि कार्यक्रमाला एका सुत्रात बांधून उपस्थितांचे आभार सहायक विधी अधिकारी आद्यश्री कांबे यांनी मानले. दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमाला महावितरण अमरावती जिल्ह्यातील सर्व दिव्यांग कर्मचारी उपस्थित होते.