आकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले ग्राम जनुना या आदिवासी गावात 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, आदिवासी संस्कृती ही प्राचीन संस्कृती असून सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी गावात आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यानुसार तालुक्यातील ग्राम जनुना या छोट्या आदिवासी गावात आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात आदिवासी युवक व महिलांनी आदिवासी पेहरावा करून आदिवासींचे पोशाख त्यांचे पारंपरिक वाद्य बासुरी व कोरकू भाषेतील गाण्याच्या तालावर नृत्य करत गावातून रॅली काढली. या कार्यक्रमाचा समारोप गावातील सार्वजनिक दुर्गा माता मंदिराच्या आवारात करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक. श्रीकृष्णा ढीगर, अध्यक्ष. बाजीराव मावस्कर, व संजय कासदे, जानराव बेलसरे, गवते सर, हरिराम कासदे, तसेच प्रबोधन सत्रात, राजेश तोटे, डोलाराम तोटे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात आजूबाजूच्या आदिवासी गावातील महिला, युवा वर्ग, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.