Saturday, July 13, 2024
spot_img
Homeशिक्षणसांगली जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं...

सांगली जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं २० ऑगस्टला डिजिटल पत्रकारांसाठी कार्यशाळा…

सांगली – ज्योती मोरे.

सांगली जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 20 ऑगस्ट 2023 रोजी डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी सांगलीत एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती,आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी आयोजित बैठकीत दिलीय.

सदर कार्यशाळेत डिजिटल मीडियाचे स्वरूप, कायदेशीर मान्यता आणि उत्तम कार्याची संधी या विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याचंही काटकर यांनी सांगितलंय.यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर, ज्येष्ठ पत्रकार आप्पा पाटणकर, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराजे जाधव,जिल्हा सरचिटणीस मोहन राजमाने,

शहराध्यक्ष सुधाकर पाटील,शहर उपाध्यक्ष ज्योती मोरे, मल्हारी ओमासे, चंद्रकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सांगली जिल्हा संघटक पदी अरुण पाटील आणि महानगरपालिका क्षेत्राध्यक्षपदी मोहसीन मुजावर यांच्या निवडीही करण्यात आल्या .सदर निवडीची पत्रं प्रदेश उपाध्यक्ष शिवराज काटकर यांच्या हस्ते देण्यात आली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: