Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीमनसर माइन येथे काम करतांना भूस्खलणामुळे कामगाराचा मृत्यू...

मनसर माइन येथे काम करतांना भूस्खलणामुळे कामगाराचा मृत्यू…

रामटेक – राजु कापसे

रामटेक : मनसर येथील कांद्री (खदान) माईन येथी खानी मध्ये काम करताना एका चा मृत्यू झाल्याची घटना दुपारी १२ वाजता घडली. सविस्तर माहिती अशी की, मृतक चेतन लखू राऊत वय ३० वर्ष रा. हेटीटोला, मनसर माईन हा एका कॉन्ट्रॅट बेसिसवर मनसर येथील कांद्री खदानित काम करीत असताना त्या ठिकाणी भुस्खलन झालं व दगड कोसळले.

त्यात तो जखमी झाला व त्याला कामठी येथील आशा हॉस्पिटल मध्ये नेले. त्यात तपासणाऱ्या डॉक्टरने चेतनला मृत घोषित केले. सुरक्षा म हासंचालनालयाकडून कांद्री खाणीच्या भूगर्भीय स्थितीची पाहणी केली असता, भूगर्भातील खडक अत्यंत कच्चा असल्याने, येथे दरड कोसळून अपघात घडतात. जे स्थानिक माँईल प्रशासनाकडून दडपले जाते.

अपघाताची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या खाण सुरक्षा महासंचालनालयातील अधिकारीही जेवण करून निघून जातात.नेहमीप्रमाणे एखाद्या कामगाराचा अपघातात मृत्यू झाला तर मृत व्यक्तीला तातडीने कामठी येथील आशा रुग्णालयात नेले जाते. परंतु आशा हॉस्पिटल कामठीकडे “डेथ डिक्लेअर लायसन्स” नाही.

त्यामुळे त्यांनी मृतदेह कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. मृताच्या कुटुंबीयांनी कामठी रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे शवविच्छेदन करण्याची विनंती केली आहे. आपल्या चुका लपवण्यासाठी माँईल प्रशासन रामटेक येथे ५ कि. मी. अंतरावर शासकीय उपजिल्हा रुग्णालय असूनही मृताच्या कुटुंबीयांना ३० किलोमीटर अंतरावर कामठी येथे पाठवून त्रास देत आहे. ही बाब निंदनीय आहे.

वरील प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मृताच्या कुटुंबीयांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी व मँगनीज ओर इंडिया लिमिटेडच्या वतीने वारसानास नोकरी देण्याची कार्यवाही करण्यात यावी.तसेच या अपघाताची चौकशी दोषीवर कार्यवाहि करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती करून, निवेदन गज्जु यादव यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे करण्यात आली आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: