- कर्मचारी ‘ आर या पार ‘ च्या मुद्रेत
- मागणी पुर्ण होईस्तव चालणार संप
रामटेक – राजू कापसे
रामटेक तालुक्यातील सर्वस्तरीय कर्मचाऱ्यांनी आज दि. १४ मार्च ला पुकारलेल्या संपात आवर्जुन सहभाग घेतलेला असुन राज्यातील दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी व यानंतर नियुक्त सर्व कर्मचान्याना १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी ही मागणी रेटुन धरली आहे. उल्लेखनिय म्हणजे या संपादरम्यान विविध कर्मचारी संघटना खुपच आक्रमक व आर या पार च्या मुद्रेत दिसुन येत आहे.
शेजारील पं. बंगाल, राजस्थान, छत्तिसगढ, झारखंड, पंजाब आणि आता हिमाचल प्रदेश राज्य सरकार जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असताना महाराष्ट्रील राज्य सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची खंत यावेळी मुलाखतीदरम्यान विविध कर्मचारी संघटनांनी व्यक्त करून दाखविली आहे. आता राज्यातील कर्मचाऱ्यांचा शासनावरील विश्वास उडत जाऊन शासनाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला असल्याचे दिसुन येत आहे.
त्यामुळे जोपर्यंत शासन महाराष्ट्र राज्यातील दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्याना १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करीत नाही तोपर्यंत आज दि. १४ मार्च पासून सुरु झालेला संप हा बेमुदत राहील असेही याप्रसंगी कर्मचार्यांनी बोलून दाखविले आहे. दरम्यान सदर संपामध्ये रामटेक तालुक्यातुन ज्या संघटना सहभागी झाल्या आहे त्यामध्ये श्री. विकास गणविर, तालुकाध्यक्ष पेंशन संघटना, श्री. पुरुषोत्तम हटवार, जिल्ला सचिव,
शिक्षक संघटना , राजूभाऊ तडस, तालुकाध्यक्ष, महसूल संघटना, श्री. अतिष जाधव, तहसील कार्यालय कर्मचारी संघटना, श्री. राजेश जगणे, विस्तार अधिकारी संघटना, श्री. वेणुमाधव येलूरे, पं.स. कर्मचारी संघटना, श्रीमती अनुपमा कोलते, श्री. रावसाहेब झटाळे, पशुवैद्यकीय संघटना, श्री. सुरेश समर्थ, पेन्शनर्स संघटना, समाजकल्याण कर्मचारी संघटना, महिला व बालकल्याण विभाग कर्मचारी संघटना, शिक्षण विभाग कर्मचारी, तलाठी संघटना, कृषी विभाग कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना, तहसीलदार व वन कर्मचारी तथा लेखनिक संघटना, नायब तहसीलदार संघटना, आरोग्य संघटना , भुमी अभिलेख, नगर परीषद कार्यालय कर्मचारी संघटना यांचेसह इतर काही संघटनांचा सहभाग आहे.