Thursday, September 19, 2024
Homeराज्यरामटेक येथे तान्हा पोळ्यासाठी लाकडी बैल सज्ज...

रामटेक येथे तान्हा पोळ्यासाठी लाकडी बैल सज्ज…

रामटेक – राजू कापसे

रामटेक शहरातील काष्ठशिल्पकार सेवक नागपुरे यांनी तान्हा पोळ्यानिमीत्त लहान मुलांसाठी लाकडी बैल बनविलेले आहे. हे लाकडी बैल बच्चे कंपनीसह नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

वर्षभर राब – राब राबून देशाला खाद्यान्न पुरविणारा बळीराजा शेतकऱ्यांचा पोळा हा एक अत्यंत महत्वाचा सण असतो. या सणाला बळीराजा आपल्या पोशिंदा बैलाला सजवून त्याची पुजा करतो. पोळा म्हटला की,”शेतकरी आणि बैलांसाठी वर्षभरातला सर्वात महत्वाचा दिवस असतो.” असा हा शेतकरीप्रिय पोळा हा सण काही दिवसांवर येवून बसला आहे.

बैल पोळ्याच्या दुसऱ्याच दिवशी लहान मुलांसाठी तान्हापोळा हा बैलपोळ्या इतकाच महत्वाचा असतो.बळीराजाचा खरा सखा हा बैलच आहे. बैलाचे महत्त्व लहान मुलांच्या देखील लक्षात यावे याकरिता तान्हापोळा रामटेक शहरसह तालुक्यातील गावा – गावात भरविण्यात येते.लहान मुले तान्हा पोळ्याला लाकडी बैलाशी खेळतात. यानिमित्ताने चिमुकल्यांना जणुकाही शेती आणि बैलाची लहानपणातच ओळख होत असते.

रामटेक शहरातील काष्ठशिल्पकार सेवक नागपुरे यांनी मुलांसाठी लाकडी बैल बनविलेले आहेत. नागपुरे यांनी आपल्या कला कौशल्याने अत्यंत मेहनतीने कोरीव असे आकर्षक लाकडी बैल निर्माण केले आहे.रामटेक शहरातील नागरिकांसाठी हे बैल आकर्षणाचे केंद्र ठरत असून येणाऱ्या तान्हापोळा सणाला या लाकडी बैलाची मोठी मागणी राहणार अशी अपेक्षा नागपुरे यांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे रामटेक तालुका हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी बैलजोडी ही असतेच. येथिल शेतकऱ्यांचा रात्रदिवस बैलांशी संबंध असतो. यामुळे ” पोळा व तान्हापोळा ” हा सण रामटेक शहर व तालुक्यातील नगरिकांसह लहान मुलांसाठी खास महत्त्व ठेवतो.सेवक नागपुरे यांना लाकडी बैल बनविण्याकरिता दिपक पैसाडेली, उमेश सोनटक्के, नंदु वाघाडे, अरविंद गोंडाणे, निरज नागपुरे, तेजराम चाफले, वंशीका नागपुरे, तिवारी सहकार्य करीत असतात.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: