अकोट येथुन जवळच असलेल्या व वारुळा गट ग्रामपंचायत मधील तांदुळवाडी येथील उमेद अभियानातील बचतगट समुहातील विविध गटातील महिलांनी १ ऑक्टोबर रोजी गावातून रॅली काढली व उमेद विभाग स्वतंत्र होण्याकरिता आपल्या मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायत वारुळा चे सरपंच ज्ञानेश्वर येवोकार व ग्रामसेवक अमेश खारोडे यांना दिले.
सर्व उमेदच्या महिलांनी गावातील मुख्य चौकात एकत्र येऊन हातात मागण्यांचे फलक घेत रॅलीला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण रॅली गावातुन काढल्यानंतर सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन देऊन रॅलीची सांगता करण्यात आली.
या रॅलीत रचना इंगळे, विद्या रायबोले, योगीता मंगळे, वृषाली टिकार, रीना रायबोले ,रीना बगाडे, रमाबाई रायबोले, रजनी पाखरे, वैशाली फाटकर, अनीता भिसे, वर्षा रायबोले, सपना वाहूरवाघ, सुशीला दामोधर, वंदना हातोले, वंदना रायबोले,
संगीता रायबोले, प्रभा रायबोले ,कल्पना तायडे, स्वाती रायबोले, संजीवनी रायबोले, अर्चना बोदडे ,अर्चना फाटकर, कीर्तीका चीकटे,तसेच उत्कर्ष महिला ग्राम संघ व बचतगटातील सर्व महिलांची उपस्थिती होती.