ठानेदाराच्या हस्ते गृह उद्योगाला सुरवात.— महिलांनी सुरू केला लाडूचा व्यवसाय.— पहिल्याच दिवशी 200 किलो लाडूची विक्री.— गरीब महिलांना मिळाले रोजगार.
अतुल दंढारे – नरखेड
30 ग्रामीण भागात महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ग्रामीण भागातील प्रतेक गावामध्ये महिला बचत गट स्थापन करण्यात आले असून. या सर्व गटांना बँके मार्फत उद्योग धंदे सुर करण्यासाठी कर्ज वाटप केल्या जात आहे. मिळालेल्या कर्जातून महिला छोट मोठे उद्योग करत आहे. असाच एक उपक्रम जलालखेडा येथील सहेली महिला बचतगटा मार्फत लाडूचा गृह उद्योग स्थापन करण्यात आला आहे.
पुढल्या महिन्यात तीळसंक्रांत आहे. त्यामुळे तिळाचे लाडूची मोठ्या प्रमाणत विक्री होत असते. त्यामुळे सहेली महिला बंचत गटाच्या वतीने बेसनाचे तुपाचे लाडू, तिळाचे लाडू, खोबराचे लाडूचा उद्योग स्थापन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातून काही अत्यंत गरीब महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या गृह उद्योगाची सुरवात गुरुवार पासून करण्यात आली असून या उद्योगाचे उद्घाटन ठाणेदार मनोज चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारतीय स्टेट बँकचे शाखा व्यवस्थापक परमेश्वर बारई, जनता हायस्कुलचे मुख्याध्यापक डॉ. संदीप धोटे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुषमा राऊत, भारतीय जनता युवा मोर्चा व जलालखेडा ग्रामपंचायत सदस्य मयूर दंढारे,वनविभागाचे सुसेन चाटे, पत्रकार श्वेता पांडे, महिला बचत गटाच्या वंदना ठाकूर, रेखा मेहेत्रे, विद्या सातपुते तसेच इतर महिला यावेळी उपस्थित होत्या. ग्रामीण भागात सर्वत्र महिला बचत गटाच्या माध्यमातून गृह उद्योगाला सूरवात करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील महिलांच्या तुलनेने ग्रामीण भागातील महिला सुध्दा सक्षम होत आहे.
ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळत असून त्या स्वतच्या पायावर उभ्या होताना दिसत आहे. महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुषमा राऊत यांच्या संकल्पनेतून या लघु उद्योगाला सूरवात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी 200 किलो लाडूचा विक्री महिलांनी केली आहे.:- लाडूचे पॉकेट दाखऊन गृह उद्योगाला सुरवात करताना ठाणेदार मनोज चौधरी व महिला बचत गटाच्या महिला.
बॉक्स, नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात महिला बचत गट स्थापन करण्यात आले असून महिलांना रोजगार मिळावे, त्या स्वतच्या पायावर उभ्या राहव्यात पुरुषांच्या तुलनेत महिला कुठेही कमी पडू नये म्हणून प्रत्येक गावात बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योगाला सूरवात करण्यात येत आहे. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करण्याचा माझा प्रयत्न आहे. सुषमा राऊत अध्यक्षा ग्रामसंघ.