श्रीरामाच्या पावन मूर्तीचे शालिग्राम शीला घेणार स्वरूप
पातूर – निशांत गवई
इतिहासात नोंद होणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या अयोध्यातील जन्मस्थळी नेपाळवरून शालिग्राम शीला गेल्या काही दिवसांपासून प्रवास करत निघाल्या असता उत्तर प्रदेश मधील अयोध्या येथे वाहनाच्या साह्याने मोठ्या थाटामाटात व मंत्रोपचाराने पूजन करून अयोध्यातील रामजन्म स्थळावर 2 फेब्रुवारी रोजी पोहचल्या त्यावेळेस विदर्भातील अकोला जिल्हा येथील पातुर तालुक्यातील काही महिलांनी या वेळी साक्षात परमेश्वर श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार,
असल्याने या शालिग्राम शीला अयोध्या येथे पोहचल्या असता पातूरच्या 15 महिलांनी या घटनेची साक्ष म्हणून शालिग्राम नामक शिलाचे दर्शन घेतले खरोखरच हजारो वर्ष या शालिग्राम शिलाचे श्रीराम रुपी स्थापना होणार असून या घटनेची साक्षीदार बनण्याचे भाग्य पातूरच्या महिलांना लाभले आहे.
या 15 महिला पातूर येथील खडकेश्वर संस्थान येथून गेल्या 29 जानेवारीला आपला प्रवास सुरू केला होता व यूपीतील हिंदू धर्मातील काशी विश्वनाथ हनुमान गडी आयोध्या गंगा महाआरती अशा अनेक पवित्र तीर्थक्षेत्र स्थळांना भेटी देऊन दर्शनाचे पुण्य प्राप्त झाले व तीर्थयात्रा श्रीराम यांच्या शालिग्राम शीला चे दर्शन घडल्याने सर्व महिला वर्गामध्ये भाग्याचे तीर्थ यात्रा घडल्यामुळे आनंद व्यक्त होत आहे भगवान श्रीरामाच्या मूर्ती रुपी ज्या शालिग्राम शिलाचे स्थापना होणार.
असल्याने या घटनेचे साक्षीदार महिला पातूर येथील इंदु निलखन, वेनू निमकंडे, मीरा ढोणे, उर्मिला राऊत, पुष्पा डोंगे, ललिता आमले, सुनंदा पेंढारकर,लिलाबाई भगत दुर्गा करंगाळे, गिता घोगरे, कलावती काकड, शकुंतला बंड चंद्रकला नीलखन, चंद्रभागा वानखडे, चंदा इंगळे ह्या 15 महिला होत्या