Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीटिटवाळा रेल्वे स्थानकानजीक महिलेवर बलात्कार…आरोपीला तात्काळ अटक…

टिटवाळा रेल्वे स्थानकानजीक महिलेवर बलात्कार…आरोपीला तात्काळ अटक…

कल्याण : प्रफुल्ल शेवाळे

टिटवाळा रेल्वे स्थानकानजीक एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार सोमवार रात्रीचा आहे. सोमवार 13 नोव्हेंबर दिवशी रात्री 8:30च्या सुमारास महिला ट्रेनमधून उतरली.आणि रेल्वे रूळनजीक च्या रस्त्यावरून घरी जात असताना एका व्यक्तीने तिला एकटं साधून तिच्यावर बलात्कार केला.

पीडीत महिला शहाड मध्ये एका खाजगी कंपनीमध्ये काम करते. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ती शहाड वरून ती लोकलने टिटवाळा स्थानकामध्ये आली. रूळावरून चालत असताना एकाने तिचा पाठलाग केला. नंतर तिला रूळांवर असलेल्या झाडाझुडपात नेले तिथेच तिच्यावर अतिप्रसंग झाला. याबाबत तोंड उघडलं तर जीव घेईल अशी धमकी आरोपीने पीडीतेला दिली होती

घडलेला सगळा प्रसंग या पीडित महिलेने आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनीही येऊन पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टिटवाळा स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी निशांत चव्हाण ला अवघ्या काही तासात अटक केली.

मात्र, हा सगळा प्रकार रेल्वेच्या हद्दीत घडल्याने पोलिसांनी हा गुन्हा रेल्वे पोलिसांकडे वर्ग करत आरोपीला देखील रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निशांत चव्हाण हा पडघा(भिवंडी) येथील एका खासगी कंपनीत काम करतो. या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त मनोज पाटील आणि कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Prafulla Shewale
Prafulla Shewalehttp://mahavoicenews.com
मी, प्रफुल्ल शांताराम शेवाळे, रा. टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे, पदवी - विद्युत अभियंता, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात 20 वर्षे अनुभव. पत्रकारिता गेल्या 7 वर्षापासून करतो, मी महाव्हाईस न्यूज ला गेल्या पाच वर्षापासून परिसरातील बातम्या देण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो...
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: