रामटेक – राजु कापसे
परमात्मा एक सेवक संस्था, रामटेक द्वारा दुधाळा आश्रम ज्ञानकेंद्र रामटेक येथे आयोजित बाबा जुमदेवजी भगवत प्राप्ती प्रगट दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यास माजी मंत्री श्री.राजेंद्रजी मुळक यांची उपस्थिती. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेतील एक महत्त्वाचं नाव म्हणजे बाबा जुमदेवजी. बाबा जुमदेवची यांनी आपल्या परमात्मा एक विचारातून दारूचे व्यसन असणाऱ्या हजारो लोकांना व्यसनातून मुक्त केले. तसेच आपल्या या कार्यातून हजारो लोकांचे संसार उघड्यावर पडण्यापासून वाचवले.
अशा या महान व्यक्तिमत्वाच्या भगवत प्राप्ती प्रगट दिनानिमित्त परमात्मा एक सेवा संस्था रामटेक यांच्या द्वारे आयोजित पदयात्रा, रथयात्रा व स्वागत सत्कार सोहळ्याला मा. राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी उपस्थित राहून कृतज्ञता व्यक्त करतांना हा वसा पुढे नेण्याची प्रेरणा मिळाळ्याचे प्रतिपादन केले. हा दिव्य सोहळा आयोजित करण्यासाठी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार मानले.