मुंबई – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरीत होऊन आयुष्यभर आंबेडकरी चळवळीसाठी काम कारणारे निवृत्त पोलिस अधिकारी आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक भालेराव यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीचा ढाण्या वाघ हरपला आहे अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिवगंत अशोक भालेराव यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.
समता सैनिक दलाच्या धर्तीवर रिपब्लिकन पक्षात सैनिक दलाची स्थापना करुन त्यांचे अध्यक्षपदाची जबाबदारी निवृत्त डी.सी.पी.अशोक भालेराव यांच्यावर सोपविण्यात आली होती.भारतीय दलीत पँथर पासुन अशोक भालेराव यांनी आम्हाला मोठी साथ दिली. त्यांच्याशी माझे जिवाभावाचे सबंध होते.अत्यंत जिवलग होते .त्यांना माझ्या नेतृत्वाबद्दल अस्था होती.ते पोलिस सेवेत असताना भारतीय दलित पँथरच्या चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी मदत केलेली आहे.
पोलिससेवेत त्यांनी फार मोठी कामगिरी केली होती.त्यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस सेवेत असताना चोख बजावली.पोलिस सेवेतुन निवृत्त झाल्यानंतर त्यांनी रिपब्लिकन पक्षात स्वत:ला झोकुन दिले.ते शिस्तप्रिय नेते होते.रिपब्लिकन पक्षात शिस्त आणि प्रोटोकॉल असावा यासाठी ते आग्रही होते.कार्यक्रम शिस्तीत व्हावेत म्हणून शिस्तबध्द रिपब्लिकन सैनिक दल सुरु करावे यासाठी ते सतत प्रयत्नशिल होते.ते पोलिस दलात असताना व निवृत्त झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीत ते वाघासारखे जगले. रिपब्लिकन पक्षाचे समर्थन करताना ते विरोधकांवर ढाण्या वाघासारखे तुटुन पडत असत प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आणि आंबेडकरी विचारावर अतुट निष्ठा असणारे ज्येष्ठ नेते अशोक भालेराव यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीची मोठी हानी झाली आहे.अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ नेते अशोक भालेराव यांचे दि.25 जुलै 2024 रोजी पहाटे घाटकोपर पूर्व येथील निवासस्थानी ह्यदयविकाराने वयाच्या 76व्या वर्षी दुखद निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन पुत्र कन्या आणि पत्नी असा परिवार आहे.यांचे पुत्र परदेशात असल्याने दोन दिवसांनी आज शनिवार दि.27 जुलै 2024 रोजी घाटकोपर पूर्व येथील स्मशानभुमीत दिवंगत अशोक भालेराव यांच्या पार्थीवावर बौध्द पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.बॅरिस्टर नाथ,पै.नगर,शिवनगर सोसायटी, घाटकोपर पूर्व येथील त्यांच्या निवासस्थाना पासुन दिवंगत अशोक भालेराव यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.यावेळी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष आणि बौध्दाचार्य प्रकाश जाधव यांनी बौध्द पध्दतीने अंत्यविधी केला.
अंत्त्ययात्रेत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे,युवक आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पप्पु कागदे,मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दर्थ कासारे,अॅड.अभया सोनावणे,उषा रामलु,सुमीत वजाळे,राजा गांगुर्डे,रवि गायकवाड,शांतीलाल बोरुडे,भिमराव सावतकर,युवराज सावंत,अशोक हिरे,रतन गवारे,सचिनभाई मोहीते,विनोद जाधव,गौतन गायकवाड,भिमराव कांबळे,विलास जाधव आदि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उद्या रविवार दिनाक.28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता घाटकोपक पूर्व येथील शिवनेरी सोसायटीतील दिवंगत अशोक भालेराव यांच्या निवासस्थानी केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे शोकाकुल भालेराव कुंटुबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.